पदाचा गैरवापर, फसवणुकीचा ठपका! DCC सरव्यवस्थापक मोटे यांना नोटीस

पदाचा गैरवापर, आर्थिक नुकसान, फसवणुकीचा ठपका! डीसीसी सरव्यवस्थापक मोटे यांना नोटीस
DCC Bank
DCC BankSakal
Updated on
Summary

ज्ञानेश्‍वर विद्यापीठाला यूजीसी, एआयसीटीई अथवा महाराष्ट्र शासनाची कोणतीही मान्यता नसल्याचे या अहवालात म्हटले आहे.

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे (Solapur District Central Co-operative Bank) सरव्यवस्थापक के. व्ही. मोटे (K. V. Mote) यांनी खोट्या शैक्षणिक प्रमाणपत्राच्या आधारे बॅंकेची फसवणूक (Cheating) करून अभियंता पदावर नोकरी मिळविली, बॅंकेच्या सरव्यवस्थापक पदाचा पदभार स्वीकारून बॅंकेची फसवणूक केली, पदाचा गैरवापर करून बॅंकेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केले यासह इतर गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. पुणे विभागाच्या विभागीय सहनिबंधक संगीता डोंगरे (Sangita Dongre) यांनी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे (Shailesh Kotmire) यांना यासंदर्भातील अहवाल पाठवून मोटे यांच्याविरुद्ध आपल्या स्तरावरून उचित कार्यवाही करण्याची सूचना केली आहे. या अहवालावरून प्रशासक कोतमिरे यांनी सरव्यवस्थापक मोटे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

DCC Bank
शिरवळसारखाच तुळजापूर तालुक्‍यात दरोडा! पोलिसांची घटनास्थळी भेट

मोटे यांची विभागीय चौकशी देखील सुरू केली आहे. या नोटिशीला अद्याप उत्तर मिळाले नसल्याचे समजते. मिलिंद शिंदे यांनी मोटे यांच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सोलापूरचे वर्ग एकचे जिल्हा विशेष लेखापरीक्षक व वर्ग दोनचे अपर विशेष लेखापरीक्षक जे. के. तांबोळी यांनी या प्रकरणाचा चौकशी अहवाल व अभिप्राय दिले आहेत. या अहवालात मोटे यांच्यावर गंभीर मुद्दे उपस्थित झाले आहेत.

आरबीआयच्या फिट ऍण्ड प्रॉपर क्रायटेरियानुसार बॅंकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी किमान पदवीसह सी. ए. आय. आय. बी. / डी. बी. एफ. / डिप्लोमा इन को-ऑपरेटिव्ह बिझनेस मॅनेजमेंट किंवा चार्टर्ड/कॉस्ट अकाउंटंट किंवा कोणत्याही शाखेचे पदव्युत्तर पदवी आवश्‍यक आहे. तसेच त्या व्यक्तीस बॅंकिंग क्षेत्रातील मध्यम/ उच्च स्तरावर कामकाज केल्याचा आठ वर्षाचा अनुभव असला पाहिजे. मोटे यांनी पुण्यातील ज्ञानेश्वर विद्यापीठातून 1985 मध्ये टेक क्वीक हा स्थापत्य अभियांत्रिकीचा कोर्स पूर्ण केला आहे. ज्ञानेश्‍वर विद्यापीठाला यूजीसी, ए. आय. सी. टी. ई अथवा महाराष्ट्र शासनाची कोणतीही मान्यता नसल्याचे या अहवालात म्हटले आहे. खोट्या शैक्षणिक प्रमाणपत्राच्या अधारे अभियंता व नंतर सरव्यवस्थापक पदावर नोकरी मिळविली. त्यांच्या नियुक्तीसाठी बॅंकेच्या संचालक मंडळाने 25 ऑक्‍टोंबर 2014 च्या बैठकीत त्यांच्या नियुक्तीचा ठराव केला होता. सरव्यवस्थापक मोटे म्हणाले, या संदर्भात आपल्याला आतापर्यंत कोणतीही नोटीस आलेला नाही.

अहवालातील ठळक...

  • प्रभारी सरव्यवस्थापक पदाचा पदभार घेतल्यानंतर आर्यन शुगरच्या मूळ कर्जदारांना स्वताच्या जबाबदारीवर केले मुक्त

  • आर्यन शुगरच्या 143 कोटी कर्जफेडीसाठी दोनशे रुपयांच्या स्टॅंपवर घेतली कर्जफेडीची हमी

  • आर्यन शुगरमध्ये डीसीसी बॅंकेच्या मोठ्या आर्थिक नुकसानीचा ठपका

विभागीय सहनिबंधकांचा या संदर्भातील अहवाल व पत्र आम्हाला मिळाले आहे. त्या अहवालावरून सरव्यवस्थापक मोटे यांची विभागीय चौकशी सुरू केली आहे. तसेच मोटे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांचे म्हणणे आल्यानंतर या संदर्भातील पुढील कार्यवाही केली जाईल.

- शैलेश कोतमिरे, प्रशासक, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक

DCC Bank
मोठ्या आवाजाचे फटाके उडवणाऱ्यांना जागेवरच एक हजारांचा दंड!

11 महिने का दबला अहवाल?

पुण्याच्या विभागीय सहनिबंधक संगीता डोंगरे यांनी 29 डिसेंबर 2020 रोजी सर व्यवस्थापक मोटे यांच्या बेकायदेशीर नियुक्तीबाबतचे पत्र सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे प्रशासक शैलेश कोथमिरे यांना पाठविले होते. या पत्रासोबत चौकशी अधिकारी तथा अपर विशेष लेखा परीक्षक जे. के. तांबोळी यांचा चौकशी अहवालही पाठविला होता. डिसेंबर 2020 नंतर 10 ते 11 महिने झाले तरीही या प्रकरणात काहीच ठोस कारवाई का झाली नाही? जिल्हा बॅंकेत सध्या नेमकं काय चाललंय?, बॅंकेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेल्या हा अहवाला 11महिने का दाबला गेला? हे प्रश्‍न आता येत्या काळात उपस्थित होण्याची दाट शक्‍यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.