वाहनधारकांनो, लक्षात ठेवा! सोलापूर शहरातील ‘या’ १६ चौकांमधील सिग्नल आहेत सुरु; दुपारी २ ते ४ पर्यंत बंद तर सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरु असणार सिग्नल

अरुंद रस्ते, रस्त्यालगत दुकाने, दुकानांसमोर थांबलेली वाहने आणि पार्किंगची असुविधा, या प्रमुख कारणांमुळे सोलापूर शहरातील बहुतेक रस्त्यांवर नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर शहरातील १६ चौकांमधील सिग्नल दररोज सुरु ठेवले जात आहेत.
solapur city
solapur citysakal
Updated on

सोलापूर : अरुंद रस्ते, रस्त्यालगत दुकाने, दुकानांसमोर थांबलेली वाहने आणि पार्किंगची असुविधा, या प्रमुख कारणांमुळे सोलापूर शहरातील बहुतेक रस्त्यांवर नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर शहरातील १६ चौकांमधील सिग्नल दररोज सुरु ठेवले जात आहेत.

सोलापूर शहरातील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सद्य:स्थितीत शहरात १६ हजारांवर रिक्षा, तीन लाखांवर दुचाकी, एक लाखांहून अधिक चारचाकी अशी साडेसहा लाखांपर्यंत वाहने आहेत. अनेक अपार्टमेंट किंवा गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये वाहनांच्या पार्किंगसाठी पुरेशी जागाच नाही आणि त्यामुळे तेथील वाहने दिवस असो की रात्र, रस्त्यांवरच थांबलेली पाहायला मिळतात.

छत्रपती शिवाजी महाराज चौकातून नवीवेस पोलिस चौकीमार्गे सरस्वती चौक, या रस्त्यांवर असो वा अन्य बहुतेक रस्त्यांच्या दिशेला तोंड करून दुकाने, हातगाडे पाहायला मिळतात. त्या दुकानाची स्वत:ची पार्किंग नसल्याने वाहने रस्त्यावरच उभी करावी लागतात. सायंकाळी ५ नंतर तर पुण्यातील रस्त्यांवरूनच प्रवास करतोय की काय, असे वाटते. त्यावेळी एवढी वाहनांची वर्दळ रस्त्यांवर पाहायला मिळते. या पार्श्वभूमीवर कोणत्याही रस्त्यावर वाहतूक कोंडी होवू नये, वाहतूक सुरळीत राहावी म्हणून दररोज आवर्जून सिग्नल सुरु ठेवले जात आहेत. जेणेकरून वाहनधारकांना सिग्नलची सवय लागावी हा हेतू आहे.

‘या’ चौकांमध्ये सुरु आहेत सिग्नल

महावीर चौक, पत्रकार भवन, आसरा चौक, गुरुनानक चौक, गांधी नगर चौक, डफरीन चौक, संत तुकाराम चौक, वोडाफोन गॅलरी चौक, सरस्वती चौक, सिव्हिल चौक, आम्रपाली चौक, शांती चौक, बोरामणी नाका चौक, महालक्ष्मी मंदिर व मार्केट यार्ड या १६ चौकांमध्ये सध्या सिग्नल सुरु आहेत. याशिवाय होटगी रोडवरील महिला हॉस्पिटल, आकाशवाणी रोडवरील ७० फूट रोड व व्हिको प्रोसेस येथे सिग्नल आहेत, पण तांत्रिक बिघाड मागील दोन-तीन वर्षांपासून दुरुस्त न झाल्याने ते बंदच आहेत. तर भैय्या चौकातील सिग्नल कायमचाच बंद आहे.

झेब्रा क्रॉसिंग वाहनांसाठी नव्हे तर...

सिग्नल यंत्रणा कार्यान्वित असलेल्या चौकात आपल्या बाजूचा सिग्नल येईपर्यंत वाहने त्याठिकाणी थांबतात. पण, अनेकजण चौकातील झेब्रा क्रॉसिंगवर (पांढऱ्या पट्ट्यांवर) वाहने थांबवतात. डफरीन चौकातील उंच झेब्रा क्रॉसिंगवर वाहने उभारलेली दिसतात. वास्तविक पाहता सिग्नल पडल्यावर त्या चौकातून रस्ता ओलांडणाऱ्या दिव्यांग व्यक्ती किंवा पादचाऱ्यांसाठी ती सोय केलेली असते. तरीदेखील, त्यावर वाहने बिनधास्तपणे थांबतात आणि चौकातील वाहतूक पोलिस त्यांच्यावर कारवाई न करता स्वत:च्या मोबाईलमध्येच व्यस्त असतात, अशी स्थिती पाहायला मिळते.

दररोज सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत सिग्नल सुरु

शहरातील रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी दररोज सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत (दुपारी २ ते ४ ही वेळ वगळता) सिग्नल सुरु ठेवले जातात. याशिवाय रस्त्यालगत थांबलेल्या वाहनांसह रस्त्यांवरून ये-जा करताना वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनांवरही शहरातील विविध चौकांमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा आधार घेऊनही दररोज कारवाई केली जात आहे. सर्वांनी वाहतूक नियम पाळावे एवढीच अपेक्षा आहे.

- सुधीर खिराडकर, सहायक पोलिस आयुक्त, सोलापूर शहर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.