काही महिन्यांपूर्वी केंद्रीय समितीने प्राणी संग्रहालयाची पाहणी करून तेथील व्यवस्थापनामध्ये त्रुटी काढल्या होत्या. त्या त्रुटींची पूर्तता महापालिकेकडून झाली नाही.
सोलापूर : शहरातील महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाच्या (Mahatma Gandhi Zoo) संदर्भात मागील अनेक वर्षांपासून महापालिका व प्राणी संग्रहालयाचे व्यवस्थापन यांच्यात फारसा ताळमेळ राहिलेला नाही. पर्यायाने या प्राणी संग्रहालयाची मान्यता संकटात आली आहे. काही महिन्यांपूर्वी याबाबत केंद्रीय समितीने प्राणी संग्रहालयाची पाहणी करून तेथील व्यवस्थापनामध्ये त्रुटी काढल्या होत्या. त्या त्रुटींची पूर्तता महापालिकेकडून झाली नाही. परिणामी आता या प्राणी संग्रहालयाची मान्यता संपण्याची वेळ आली आहे. आता शहरातील हे एकमेव प्राणी संग्रहालय असलेल्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाची मान्यता काढून ते बंद करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. सर्वसामान्य नागरिक, निसर्गमित्रांना महापालिकेच्या प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल चिंता वाटते आहे. या अनुषंगाने प्राणी संग्रहालय बचाव समिती (Prani Sangrahalaya Bachav Samiti) स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. (Movements to set up a rescue committee to save the zoo in Solapur have gained momentum)
जिल्ह्यातील विद्यार्थी, राज्य व राज्याबाहेरून येणाऱ्या पर्यटकांसाठी प्राणी संग्रहालय एक आकर्षण आहे. विशेष परिसरातील दोनशे किलोमीटर अंतराच्या परिसरात एकही प्राणी संग्रहालय नाही. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या बाहेरून मराठवाडा, कर्नाटक भागातील पर्यटकांना प्राणी संग्रहालय पाहण्याची एक पर्वणी असते. शहराला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी महत्त्वाचे स्थान आहे. मात्र हे लक्षात न घेता यंत्रणा दुर्लक्ष करत आहेत, असे चित्र समोर येऊ लागले आहे. या स्थितीत आता प्राणी संग्रहालय वाचवण्यासाठी निसर्गप्रेमी व पर्यटन प्रेमी पुढाकार घेऊ लागले आहेत. सोशल मीडियावर (Social Media) आता बचाव समिती स्थापन करण्याबाबत आवाहन केले जात आहे. प्राणी संग्रहालय वाचवण्यासाठी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर (Union Environment Minister Prakash Javadekar) यांच्याकडे भूमिका मांडून प्रयत्न करावे लागणार आहेत. लोकप्रतिनिधी व नागरिकांनी पुढाकार घेतल्यास ते शक्य होणार आहे. दुसरा मार्ग न्यायालयीन लढाईचा असणार आहे. त्यामुळे याबाबत भूमिका ठरवण्याची वेळ आली आहे. सोलापूरकरांना एकीकडे विकासासाठी संघर्ष करावा लागत आहे तर दुसरीकडे जे सोलापुरात आहे ते टिकवून धरण्यासाठी देखील प्रयत्न करावे लागत आहेत.
प्राणी संग्रहालय वाचवण्याचे काम झालेच पाहिजे. हे संग्रहालय शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी व पर्यटकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. नगरसेवकांनी थोडे लक्ष घालून आवश्यक त्या बाबी पूर्ण केल्यास प्राणी संग्रहालय वाचवता येईल असे वाटते. आपल्या शहराचा हा ठेवा जपलाच पाहिजे. कारण, एकदा प्राणी संग्रहालय बंद झाले तर ते पुन्हा मिळवणे कदापी शक्य नाही.
- निनाद शहा, पर्यावरण अभ्यासक, सोलापूर
सुदैवाने आपल्या शहरात प्राणी संग्रहालय आहे ते वाचवले पाहिजे. महापालिकेच्या अडचणी असतील तर बीओटी पद्धतीने एनजीओ चालवू शकतात. पण प्राणी संग्रहालयाचे अस्तित्व राहणे हे शहराच्या नावलौकिकासाठी आवश्यकच आहे.
- अजित चौहान, निसर्गमित्र, सोलापूर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.