Solapur Lok Sabha Poll : निंबाळकर कुटुंबीयांकडे २५५ कोटींची मालमत्ता; महायुतीचे उमेदवार सातपुतेंकडे ५७ लाखांची मालमत्ता

लोकसभेचे भाजपचे माढ्यातील उमेदवार, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या कुटुंबीयांकडे जंगम व स्थावर, अशी एकूण २५५ कोटी ९६ लाख ४३ हजारांची तर सोलापूरचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्याकडे ५७ लाखांची मालमत्ता आहे.
Ranjeetsinha Hindurao Naik-Nimbalka ram satpute
Ranjeetsinha Hindurao Naik-Nimbalka ram satputeSakal
Updated on

Solapur News : लोकसभेचे भाजपचे माढ्यातील उमेदवार, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या कुटुंबीयांकडे जंगम व स्थावर, अशी एकूण २५५ कोटी ९६ लाख ४३ हजारांची तर सोलापूरचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्याकडे ५७ लाखांची मालमत्ता आहे. सर्वात श्रीमंत उमेदवार म्हणून नाईक-निंबाळकर यांची चर्चा असून त्यांच्याकडे एक कोटी ४६ लाखांच्या मर्सिडीज बेंझ या महागड्या कारसह सहा चारचाकी आहेत.

४७ वर्षीय खासदार नाईक-निंबाळकर शिवाजी विद्यापीठातून कला शाखेतील पदवीधर आहेत. त्यांच्यासह त्यांच्या पत्नी जिजामाला व ताराराजे, इंदिराराजे यांच्या नावे एकूण २३६ कोटी ३० लाख १३ हजारांची जंगम तर १९ कोटी ६६ लाख २९ हजारांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या व पत्नीच्या नावे एकूण ४७ कोटी ५७ लाखांचे कर्ज आहे. तर पावणेदोन किलोपेक्षा जास्त म्हणजे १९५ तोळे सोने आहे.

३६ वर्षीय आमदार सातपुते हे पुणे विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवीधर आहेत. त्यांची व पत्नी संस्कृती सातपुते यांची एकूण ३७ लाख ४४ हजार जंगम तर १९ लाख ७५ हजार स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या नावे पिस्तुलाचा परवाना असून, त्याची किंमत दोन लाख ४९ हजार आहे. तसेच मांडवे येथे त्यांच्या नावे १४ लाखांची दोन एकर २९ आर तर पत्नीच्या नावे एक एकर दोन आर शेती आहे. त्यांच्याकडे बुलेटसह पाच दुचाकी आहेत. तसेच १६ तोळे सोने आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.