'मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय घ्या, अन्यथा लॉंगमार्च'

मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय घ्या, अन्यथा लॉंगमार्च : खासदार संभाजीराजे
मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय घ्या, अन्यथा लॉंगमार्च : खासदार संभाजीराजे
मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय घ्या, अन्यथा लॉंगमार्च : खासदार संभाजीराजेSakal
Updated on
Summary

मराठा समाज आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारची जी जबाबदारी आहे ती केंद्राने घ्यावी व राज्य सरकारची जी जबाबदारी आहे ती राज्य सरकारने घ्यावी, असे आवाहन खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केले.

मोहोळ (सोलापूर) : मराठा समाजाच्या आरक्षणासह (Maratha reservation) ज्या काही प्रमुख मागण्या आहेत, त्यासंदर्भात केंद्र सरकारची (Central Government) जी जबाबदारी आहे ती केंद्राने घ्यावी व राज्य सरकारची (State Government) जी जबाबदारी आहे, ती राज्य सरकारने घ्यावी, असे आवाहन खासदार छत्रपती संभाजीराजे (MP Chhatrapati Sambhajiraje) यांनी केले. मराठा आरक्षण व इतर विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मोहोळ (Mohol) येथे आयोजित जनसंवाद यात्रेमध्ये (Jansanwad Yatra) मराठा बांधवांना खासदार संभाजीराजे यांनी मार्गदर्शन केले.

मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय घ्या, अन्यथा लॉंगमार्च : खासदार संभाजीराजे
'MPSC'च्या हजारो उमेदवारांच्या स्वप्नांचा चुराडा!

खासदार संभाजीराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती व बारा बलुतेदारांना सोबत घेत स्वराज्य निर्माण केले. तर भारतामध्ये सर्वात प्रथम राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी पुरोगामित्वाचा आदर्श निर्माण करीत सामाजिक समता निर्माण होण्यासाठी शोषित पीडितांना 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आरक्षण दिले होते. त्यामुळे सरकारची भूमिकाही समाजातील जे शोषित, पीडित आर्थिकदृष्ट्या मागास आहेत ते सर्वचजण सुखी- समाधानी असले पाहिजेत. ते सर्व समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील असावेत, अशीच असावी. मराठा समाजाच्या आरक्षण व अन्य मागण्यांच्या संदर्भात प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांसह गेल्या काही महिन्यांपासून मी सातत्याने भेटी घेऊन चर्चा केली आहे. या चर्चेच्या दरम्यान जे काही बोलणे झाले ते समाज बांधवासमोर सांगण्यासाठी जनसंवाद यात्रेद्वारे मी इथे आलो असल्याचेही ते म्हणाले.

मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक मागासलेपण हा मुद्दा उपस्थित केला आहे. परंतु, सामाजिक मागासलेपण सिद्ध करायचे असेल तर मागासवर्गीय आयोग निर्माण केला पाहिजे. ही सर्व प्रकिया सावकाश आहे. त्यामुळे पहिल्यांदा एक समिती स्थापन करून सर्वेक्षण करून मराठा समाजाचे सामाजिक मागासलेपण तरी सिद्ध करा. कारण, 70 टक्के मराठा समाज आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे. त्यामुळे राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणासह अन्य काही महत्त्वाच्या मागण्यांवर त्वरित सकारात्मक पावले उचलावीत. अन्यथा, लाखो समाजबांधवांसह पुणे ते मुंबई लॉंगमार्च काढणार असल्याचा इशारा खासदार संभाजीराजे भोसले यांनी राज्य सरकारला दिली.

मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय घ्या, अन्यथा लॉंगमार्च : खासदार संभाजीराजे
दोन्ही बायकांचा मुख्याध्यापक पतीला शॉक अन्‌ तो झाला पोलिस ठाण्यात लॉक!

याप्रसंगी माऊली पवार, राजन जाधव, अकुंश कदम, राजेंद्र कोंढरे, ऍड. श्रीरंग लाळे, डॉ. स्मिता पाटील, शुभांगी लंबे, दत्ता मुळे, विनोद साबळे, संतोष गायकवाड यांच्यासह शहर व तालुक्‍यातून प्रामुख्याने रावसाहेब राजन पाटील, दीपक गायकवाड, उमेश पाटील, नागेश साठे, प्रकाश चवरे, सीमा पाटील, सुनील चव्हाण, सतीश काळे, मानाजी माने, शिवाजी चव्हाण, यशवंत गुंड, बापू डोके, सोमनाथ पवार, ऍड. हिंदुराव देशमुख, सुनील मोरे, सत्यवान देशमुख, महेश देशमुख, नाना डोके, आकाश फाटे, त्रिपाल पवार आदींसह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.