Solapur ST News : महिलांना सवलत, लालपरीला बरकत; मंगळवेढा आगाराच्या उत्पन्नात वाढ

महाराष्ट्र राज्याच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी मोठी घोषणा केली होती.एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात महिलांसाठी ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती.
msrtc 50 percent offer for women mangalwedha depot income of 28 cr
msrtc 50 percent offer for women mangalwedha depot income of 28 cr Sakal
Updated on

सलगर बुद्रुक: महाराष्ट्र राज्याच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी मोठी घोषणा केली होती.एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात महिलांसाठी ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती.

त्यानंतर १७ मार्च २०२३ पासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची योजना लागू करण्यात आली आहे.या योजनेला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ स्तरावर 'महिला सन्मान योजना' असे नाव देण्यात आले आहे.

या महिलांसाठीच्या सवलतीच्या योजनेमुळे मंगळवेढा एसटी आगाराचा 2023 सालच्या एप्रिल ते डिसेंबर या गेल्या नऊ महिन्यात 28 कोटी 11 लाख 47 हजार रुपयाचे उत्पन्न मिळाले आहे.दरम्यान 2022 मधील एप्रिल ते डिसेंबर या 9 महिन्यांचे उत्पन्न 20 कोटी 26 लाख 26 हजार एवढे होते.

म्हणजेच महिलांना एसटीच्या तिकिटात 50 टक्के सवलत दिल्याने 2022 च्या तुलनेत 2023 च्या 9 महिन्यात 7 कोटी 85 लाख 21 हजार एवढे जाड उत्पन्न मिळाले आहे.त्यामुळे राज्य शासनाने महिलांना सवलत दिल्यामुळे लालपरीला बरकत आल्याचे चित्र मंगळवेढा आगारात आहे.ही तुलनात्मक आकडेवारी 2022 मधील एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्याच्या बरोबर 2023 मधील एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्याची आहे.

जाऊ बाई जोरात - महिला सन्मान योजना सुरू होताच या योजनेला महिलांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. 1 एप्रिल 2023 पासून 31 डिसेंबर या 9 महिन्याच्या कालावधीत तब्बल 18 लाख 78 हजार 441 महिलांनी मंगळवेढा आगाराचा लालपरीतून प्रवास केला आहे.त्यामुळे महिला प्रवाश्यांपासून मंगळवेढा आगाराला 5 कोटी 38 लाख 4 हजार 335 इतके उत्पन्न मिळाले आहे.

महिला प्रवासी संख्या दृष्टीक्षेपात

1) एप्रिल -1 लाख 87 हजार 726

2) मे-2 लाख 43 हजार 155

3) जून-2 लाख 20 हजार 208

4) जुलै-2 लाख 10 हजार 956

5) ऑगस्ट-2 लाख 31 हजार 252

6) सप्टेंबर-1 लाख 84 हजार 85

7) आक्टोंबर-1 लाख 83 हजार 41

8) नोहेंबर -2 लाख 66 हजार 03

9)डिसेंबर-2 लाख 11 हजार 415

एकूण - 18 लाख 78 हजार 441 महिला प्रवासी

मिळालेले उत्पन्न

1) एप्रिल - 52 लाख 84 हजार 434 रु

2) मे- 71 लाख 42 हजार 588 रु

3) जून- 60 लाख 7 हजार 591 रु

4) जुलै- 60 लाख 19 हजार 311 रु

5) ऑगस्ट -68 लाख 6 हजार186 रु

6) सप्टेंबर- 51 लाख 7 हजार 30 रु

7) आक्टोंबर -48 लाख 53 हजार 205 रु

8) नोहेंबर- 65 लाख 41 हजार 707रु

9) डिसेंबर -60 लाख 42 हजार 283 रु

एकूण उत्पन्न - 5 कोटी 38 लाख 4 हजार 335 रु

राज्य शासनाने महिलांसाठी महिला सन्मान योजना आणल्यामुळे मंगळवेढा आगाराला खूप फायदा झालाय.या योजनेमुळे महिलांना सन्मानपूर्वक एसटीच्या सेवेचा लाभ देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे.

- संजय भोसले,मंगळवेढा आगार प्रमुख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.