बार्शीत आढळलेला म्युकरमायकोसिस बुरशीच्या दोन प्रजातींचा! तज्ज्ञांचे संशोधन

बार्शीत आढळलेला म्युकरमायकोसिस बुरशीच्या दोन प्रजातींचा
Mucormycosis
MucormycosisCanva
Updated on
Summary

रुग्णाच्या क्‍लिनिकल सॅम्पलमध्ये आढळलेल्या दोन्ही प्रजाती भिन्न प्रकारच्या व एकत्रित आढळल्या आहेत. प्रजाती क्रमांक 1 ही 80 टक्के तर प्रजाती क्रमांक 2 ही 20 टक्के प्रमाणात असल्याचे दिसून आले.

बार्शी (सोलापूर) : येथील रुग्णालयात रुग्णावर उपचार सुरू असताना आढळून आलेल्या म्युकरमायकोसिस (Mucormycosis) बाधित रुग्णावरील शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्यानंतर, तपासणीसाठी नमुने घेतले असता, बुरशीच्या दोन प्रजातींमुळे (fungi of two species) म्युकरमायकोसिस झाला असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. रुग्णावर योग्य उपचार होण्यासाठी या संशोधनातून दिशा मिळणार आहे, असे मत डॉ. सुहास कुलकर्णी (Dr. Suhas Kulkarni) व संशोधिका अमृता शेटे-मांडे (Researcher Amrita Shete-Mande) यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. (Mucormycosis disease found in fungi of two species in Barshi)

Mucormycosis
म्युकरमायकोसिसच्या 16 रुग्णांनाच "जनआरोग्य योजने'चा लाभ !

बार्शी येथील लीला नर्सिंग होम येथे डॉ. तरंग शहा यांनी शस्त्रक्रिया केल्यानंतर रुग्णाचे नमुने तपासणीसाठी डॉ. शहा यांच्याकडून घेऊन सूक्ष्मजीवशास्त्राचे संशोधक डॉ. सुहास कुलकर्णी व अमृता शेटे- मांडे यांनी त्याचे संशोधन केले. संशोधनातून म्युकरमायकोसिस हे बुरशीच्या दोन प्रजातींच्या प्रादुर्भावामुळे झाल्याचे निष्पन्न झाले असून, रुग्णातील सायनसच्या क्‍लिनिकल सॅम्पलमधील बुरशीच्या प्रक्रियेनंतर मायक्रोस्कोपद्वारे सूक्ष्म निरीक्षण केले असता त्यामध्ये दोन प्रकारच्या बुरशींच्या प्रजाती सापडल्याचे अमृता शेटे-मांडे यांनी सांगितले.

Mucormycosis
परीक्षेनंतर दोनच दिवसांत निकाल जाहीर! सोलापूर विद्यापीठाची कामगिरी

रुग्णाच्या क्‍लिनिकल सॅम्पलमध्ये आढळलेल्या दोन्ही प्रजाती भिन्न प्रकारच्या व एकत्रित आढळल्या आहेत. प्रजाती क्रमांक 1 ही 80 टक्के तर प्रजाती क्रमांक 2 ही 20 टक्के प्रमाणात असल्याचे दिसून आले. करण्यात आलेले निरीक्षण रुग्णाच्या आरोग्याच्या हितासाठी व पुढील उपचाराची दिशा ठरविण्याकरिता अत्यंत महत्त्वाचे असल्याचे डॉ. सुहास कुलकर्णी यांनी सांगितले.

आतापर्यंत म्युकरच्या 40 प्रजातींची नोंद असल्याचेही त्यांनी नमूद करून संशोधनात आढळलेल्या दोन प्रजाती याप्रमाणे आहेत...

  • प्रजाती क्र. 1 : या प्रजातीमध्ये मायसेलिया, स्पोऱ्यांजीओफोर, स्पोऱ्यांजियम व असंख्य स्पोअर्स आढळले आहेत.

  • प्रजाती क्र. 2 : या प्रजातीमध्ये स्पोऱ्यांजीओफोर तसेच स्पोऱ्यांजियम आढळले नसून, स्पोअर्स एक विशिष्ट रचनेत डायरेक्‍ट मायसेलियाच्या पृष्ठभागावर आढळले आहेत.

कोण आहेत संशोधक...

Dr. Suhas Kulkarni and researcher Amrita Shete-Mande
Dr. Suhas Kulkarni and researcher Amrita Shete-MandeCanva
  • डॉ. सुहास कुलकर्णी : हे सेवानिवृत्त प्राध्यापक असून सूक्ष्मजीवशास्रज्ञ व संशोधक आहेत. मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय समन्वयक, मराठी विज्ञान परिषद, शाखा बार्शीचे उपाध्यक्ष आहेत. त्यांचे 50 पेक्षा अधिक रिसर्च पेपर्स प्रसिद्ध झाले असून 15 नवीन शोध लावले आहेत.

  • सौ. अमृता शेटे-मांडे : या सूक्ष्मजीवशास्त्राच्या अभ्यासिका असून पीएचडी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.