आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनगरकर ‘ॲक्‍टिव्ह मोड’मध्ये

नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अनगरकर पुन्हा एकदा ॲक्‍टिव्ह मोडमध्ये आले आहेत.
rajan patil
rajan patil sakal media
Updated on

सोलापूर : १९९५ ते २००९ पर्यत सलग पंधरा वर्ष मोहोळ विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आलेले माजी आमदार राजन पाटील (Rajan patil ) यांचा मोहोळ (Mohol) विधानसभा मतदारसंघ २००९ मध्ये राखीव मतदारसंघ झाला. त्यानंतर माझ्याच माणसाला आमदारकीचे तिकीट मिळाले पाहिजे, हा अट्टाहास न धरता राष्ट्रवादी (Ncp) पक्षाचे सर्वेसर्वां शरद पवार (Sharad Pawar) यांचा शब्द अंतिम आदेश समजून त्यांनी दाखविलेल्या विश्वासाला सार्थ ठरवित सातत्याने वाढत्या मताधिक्‍याने लागोपाठ तीन वेळा पक्षनेतृत्वाने दिलेल्या उमेदवाराला विधानसभेत पाठविण्याची किमया माजी आमदार राजन पाटील यांनी करून दाखविली आहे. आता नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अनगरकर पुन्हा एकदा ॲक्‍टिव्ह मोडमध्ये आले आहेत.

rajan patil
इतर देशांपेक्षा हॉस्टेल-मेसच्या खर्चात पूर्ण होते जर्मनीतील शिक्षण!

सध्या भाजपनिवासी असलेले माजी पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांचे नाव घ्यावे लागेल. ढोबळे यांच्या २००९ ते २०१४ या कारकीर्दीमध्ये प्रत्यक्ष विकासकामाऐवजी चर्चाच अधिक झाली. परिणामी ढोबळे सरांनीही गुपचुपपणे तर कधी उघडपणे अनगरकर विरोधी गटाशी अधिक सलोख्याचे सबंध ठेवण्याचे काम केले. त्यानंतरच्या २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाने दिलेल्या रमेश कदम या उमेदवारास अवघ्या सतरा दिवसामध्ये आमदार म्हणून राजन पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षावर व व्यक्तीशः शरद पवार यांच्यावर निष्ठा असणाऱ्या मतदारांच्या मदतीने चांगल्या मताधिक्‍याने निवडून देऊन विधानसभेत पाठविले. पंरतु, रमेश कदम यांचा स्वभाव व कामकरण्याची पद्धत यांचा व अनगरकरांचा शेवटप्रर्यत कधी ताळमेळ बसलाच नाही. अवघ्या दीड वर्षातच आमदार कदम यांच्यावर अण्णाभाऊ साठे महामंडळातील गैरव्यवहाराचा ठपका ठेवण्यात आल्याने त्यांची रवानगी कारागृहात झाली.

विद्यमान आमदारच कारागृहात गेल्याने तालुका विकासाच्या गतीपासून लांब राहिला. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाने दिलेल्या इंदापूर तालुक्‍यातील यशवंत माने यांना चांगल्या मताधिक्‍याने विजयी केले. सलग तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राखीव उमेदवार वाढत्या मताधिक्‍याने विधानसभेत पाठवायची हॅट्रीकक राजन पाटील यांनी केली. या सर्व निवडणुकीच्या यशाचे रहस्य म्हणजे खोट्या आश्वासनाला जराही स्पर्श न करता राजन पाटील यांनी आपल्या रोखठोक स्वभावाने फक्त माणसाला माणूस जोडायचे काम केले. या कालावधीत त्या-त्या प्रसंगी स्वतःपेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या नेत्यांना मानसन्मान देणे, त्या नेत्यांच्या शब्दांना व कार्यकर्त्यांनाही समानतेची वागणुक देत सत्तेच्या विक्रेंदीकरणामध्ये सामील करून घेणे, अशा अनेक बाबींचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल.

rajan patil
तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या पर्यटनवृद्धीसाठी प्रयत्नशील : गजानन गुरव

गेल्या काही वर्षात राजन पाटील यांचे राजकीय पुर्नवसन करण्याची मागणी साततत्याने जोर धरत आहे. अद्याप तरी पक्षश्रेष्ठींनी कार्यकर्त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्षच केल्याचे दिसत आहे. मात्र तरीही पवार कुटुंबीयांशी वैयत्कीक निष्ठा अबाधित ठेवत पद असो वा नसो मतदारांशी प्रत्यक्ष सातत्यपुर्ण संपर्क ठेवत त्यांच्या सुख, दुःखामध्ये सामील होऊन मतदारसंघातील समस्या समजावून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न माजी आमदार राजन पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य विक्रांत पाटील, पंचायत समिती सदस्य तथा राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष अंजिक्‍यराणा पाटील हे सातत्याने करताना दिसत आहेत.

राजकीय विरोधकांकडे दुर्लक्ष

राजकीय विरोधक व पक्षांतर्गत गटबाजी करणाऱ्या विरोधकांच्या सोशल मीडियावरील टिकेकडे पूर्णत: दुर्लक्ष करत या तिघांनीही फक्त निवडणुकांच्या दरम्यानच मतदारांशी जनसंपर्क न ठेवता दैनदिंन सातत्य मतदारांशी व कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवला आहे. आता पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांध्ये अनगरकरांचा ॲक्‍टीव्ह मोड तालुक्‍यामध्ये पुनश्‍च: एकदा निर्विवाद वर्चस्व राखणार, असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()