Solapur news
Solapur newsesakal

Solapur : सोलापुरात महापालिकेचे जेनेरिक औषध केंद्र

कामाची निविदा अंतिम टप्प्यात; नागरिकांची वैद्यकीय सोय, आर्थिक दिलासा
Published on

सोलापूर : शहरासह हद्दवाढ भागातील महापालिकेच्या प्रसूतिगृह दवाखान्यांसह नागरी आरोग्य केंद्रामध्ये दहा ठिकाणी अमृत स्टोअरच्या धर्तीवर जेनेरिक औषधी केंद्रे उभारली जाणार आहेत. या कामाची निविदा अंतिम टप्प्यात असून नवीन वर्षात या कामाला मुहूर्त लागणार आहे. त्यामुळे शहरात इतर मेडिकलमधून नागरिकांची होणारी आर्थिक लूट या केंद्रामुळे थांबणार आहे.

Solapur news
Travel Tips: बाईक रायडिंगचा भन्नाट अनुभव घ्यायचाय? पाहा भारतातील सर्वोत्तम पर्याय

केंद्र शासनाच्यावतीने अमृत स्टोअरच्या धर्तीवर शहर व हद्दवाढ भागात असलेल्या प्रसूतिगृह आणि नागरी आरोग्य केंद्र या ठिकाणी जेनेरिक औषध केंद्र उभारण्यात येणार आहे. सर्वसामान्य आणि गोरगरीब नागरिकांना कमी किमतीत औषधे उपलब्ध करून देणे. गोळ्या-औषधांवरील खर्चावर नियंत्रण आणून आर्थिक दिलासा देणे हा या केंद्राचा मुख्य उद्देश आहे. शासन आदेशानुसार महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या सर्व रुग्णालय परिसरात महापालिका प्रशासनाच्यावतीने जेनेरिक औषध केंद्र उभारले जाणार आहे.

Solapur news
Parenting Tips : डॉ.एपीजे अब्दुल कलामांनी पालकांना दिलेला लाखमोलाचा सल्ला,पालकांनी घ्यावी विशेष काळजी

त्यासाठी नॅकोफ इंडिया लिमिटेड (एनएसीओएफ) या संस्थेस महापालिका आरोग्यविभागाच्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी दहा वर्षांचा करार केला असून याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. नववर्षात या कामाला प्रत्यक्षात सुरवात होणार आहे. सर्वसामान्य नागरिकांचा गोळ्या-औषधांवर होणारा खर्च नियंत्रणात येणार आहे.

Solapur news
Vastu Tips : घरातील दागिन्यांची दिशा बदला, घरात सोन्या-नाण्याची कमी पडणार नाही

हॉस्पिटलच्या उत्पन्नात होणार वाढ

अमृत स्टोअरच्या धर्तीवर नॅकोफ इंडिया लिमिटेड (एनएसीओएफ) या संस्थेस औषधी दुकान सुरू करण्यासाठी १५० स्क्वेअर फुटाची जागा व इतर आवश्यक सोई-सुविधा रुणालय परिसरात दिले जाणार आहे. संबंधित संस्थेकडून महापालिकेला रेडीरेकनर दराने जागेचा मोबदला मिळणार आहे. प्रशासनाने या संस्थेशी दहा वर्षांचा करार केला असून दर तीन वर्षांनी भाडेकरारामध्ये पाच टक्क्यांची दरवाढही निश्चित केली आहे. त्यामुळे महापालिकेला वर्षाकाठी मिळणाऱ्या जागेच्या भाडेपोटीच्या रक्कमेतून नागरिकांना इतर सुविधा उपलब्ध करून देण्यास आर्थिक हातभार लागणार आहे.

Solapur news
Astro Tips : दुसऱ्याची साडेसाती मागे लावून घ्यायची नसेल तर, कधीच कोणाकडून उधार घेऊ नका या गोष्टी

या दहा ठिकाणी उभारणार केंद्र

विडी घरकुल, मुद्रा सनसिटी, जिजामाता, देगाव या चार नागरी आरोग्य केंद्रांसह पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रसूतिगृह, रामवाडी प्रसूतिगृह, दाराशा प्रसूतिगृह, साबळे प्रसूतिगृह, हिंगलाजमाता प्रसूतिगृह, चाकोते प्रसूतिगृह अशा सात ठिकाणी औषध केंद्र उभारण्याला मान्यता देण्यात आली आहे.

Solapur news
Skin Care Tips: पायाला शेविंग करताना अशा चुका टाळा, अन्यथा त्वचेचे होईल भयंकर नुकसान

शहरातील सर्वच नागरिकांना कमी दरामध्ये औषध उपलब्ध होतील. शासनाने नियुक्त केलेल्या कंपनीसोबत हा करार करण्यात आला आहे. महापालिकेच्या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना याचा अधिकाधिक फायदा होईल.

- डॉ. मंजिरी कुलकर्णी, प्रभारी आरोग्याधिकारी, महापालिका

महापालिका प्रसुतीगृहात दाखल झालेल्या रुग्णांना सगळ्याच प्रकारचे साहित्य व औषध उपलब्ध होत नाही. बऱ्याचवेळा औषध बाहेरून मागविले जाते. अशावेळी रुग्णांच्या नातेवाइकांना इतर मेडिकलमधून औषध व वैद्यकीय साहित्य आणण्यासाठी पळापळ करावी लागते. बऱ्याचवेळा मेडिकलला जाण्यासाठीही वाहन नसते. अशा अनेक समस्या असतात. या औषध केंद्रांमुळे या समस्या दूर होतील.

- वैशाली माशाळे, सामाजिक कार्यकर्त्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.