Solapur Crime : विवाहितेचा छळ करून खून; रेल्वे स्टेशनवर आढळला मृतदेह, 'तिच्या'जवळ होती चिठ्ठी!

पती व सासूविरुद्ध करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल
Crime News
Crime Newsesakal
Updated on
Summary

रुक्मिणीचा मृतदेह पोफळज येथे कसा आला? याबाबत कसलीही चौकशी झाली नाही.

करमाळा : पती व सासूने विवाहितेचा छळ करून खून केल्याचा गुन्हा करमाळा पोलिस (Karmala Police) ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. याबाबत फिर्यादीने न्यायालयात (Court) दाद मागितल्यानंतर न्यायालयाने हा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

जवळा (ता. जामखेड) येथील विवाहित महिलेचा मृतदेह पोफळज (ता. करमाळा) येथील रेल्वे स्टेशनवर आढळून आला होता. संजय नरहरी बिचीतकर व सुजनाबाई नरहरी बिचीतकर (दोघेही रा. जवळा, ता. जामखेड, जिल्हा अहमदनगर) अशी दोन संशयित आरोपींची नावे आहेत.

Crime News
Whatsapp ला I'm Sorry असा स्टेटस् ठेऊन दाम्पत्यानं केली गळफास घेऊन आत्महत्या; आठ महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह

या प्रकरणात करमाळा पोलिसांनी कोणताही तपास न करता पुढील कार्यवाही केल्याचे नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी मुलीची आई गीताबाई संजय सरडे (वय ७२, रा. जवळा, ता. जामखेड) यांनी तक्रार दिली आहे. गीताबाई सरडे यांची मुलगी रुक्मिणी हिचा विवाह ३० वर्षांपूर्वी जवळा गावातील संजय बिचीतकर याच्याशी झाला होता.

Crime News
बारा फूट ओढ्यात कार कोसळून दोन मित्र ठार; क्षणार्धात दोन्ही कुटुंबांच्या स्वप्नांचा चुराडा, लहान बहिणीचा आक्रोश मन हेलावणार

वेळोवेळी आपणास सासरी त्रास होत असल्याबाबत रुक्मिणी कायम आईला सांग होती. तर पतीही गीताबाई यांना, तुमची मुली भोळसर आहे. मला सोडचिठ्ठी घ्यायची आहे, असे म्हणत असे, असेही फिर्यादीत म्हटले आहे.

Crime News
डॉ. आंबेडकर कमान वाद : 15 दिवसांनी निर्णय न झाल्यास आंदोलनाचा लढा तीव्र करणार; बेडगच्या सरपंचांचा स्पष्ट इशारा

२५ मे २०२३ रोजी रुक्मिणी राहत्या घरी होती. पण २६ मे रोजी रुक्मिणीचा मृतदेह सायंकाळी सहाच्या सुमारास पोफळज (ता. करमाळा) येथे रेल्वे रुळालगत आढळून आला होता. सहायक पोलिस निरीक्षक पोपट टिळेकर तपास करीत आहेत.

न्यायालयाने दिले गुन्हा दाखल करण्याचे आदेश

रुक्मिणीचा मृतदेह पोफळज येथे कसा आला? याबाबत कसलीही चौकशी झाली नाही. शिवाय तिच्याकडे मोबाईल नव्हता, तरीही तिच्याजवळ मुलीचा मोबाईल नंबर असलेली चिठ्ठी लिहून ठेवली होती. ही चिठ्ठी कोणी लिहिली? रुक्मिणीला लिहिता- वाचता येत नव्हते.

Crime News
Satara : आधी वडिलांचं अपघाती निधन आणि आता 21 वर्षाची लेकही..; उदयनराजेंनी लिहिली हृदयद्रावक पोस्ट

शिवाय घरापासून ती पोफळजपर्यंत कशी पोचली? याबाबत कसलेही पुरावे नाहीत. तरीही या प्रकरणाची सखोल चौकशी न करता पुढील कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे फिर्यादी न्यायालयात गेली. त्यावेळी न्यायालयाने या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.