सोलापूर : नागपंचमी दिवशी नागदेवतेची मनोभावे पूजा केली जाते. स्त्रिया वारुळावर जाऊन लाह्या व दूध वाहून वारुळाला पूजतात. पण खरं तर नाग लाह्या खात नाही व दूध पीत नाही. हे दोन्ही पदार्थ साप खात नसला तरी लाह्या खाण्यासाठी उंदीर बिळाजवळ येतात आणि सापाला आयते भक्ष्य मिळते. मात्र, हाच साप नागपंचमी व्यतिरिक्त इतर दिवशी दिसला तर मारला जातो.
साप मारण्याऐवजी त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडून द्यावे. उंदीर नष्ट करण्यासाठी सापांचे रक्षण करणे आवश्यक आहे, असे आवाहन सर्पअभ्यासक राहुल शिंदे यांनी केले आहे.
सर्परक्षणाबद्दल अधिक महिती देताना राहुल शिंदे सांगतात की, भारतातील सापांना १९७२ सालच्या वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत संरक्षण देण्यात आले आहे. परंतु याची अंमलबजावणी होत नसल्याने सापांची हत्या अजूनही थांबल्या नाहीत. त्यामुळेच साप आपला शत्रू नसून मित्र आहे, हे जेव्हा प्रत्येकास कळेल तेव्हा खऱ्या अर्थाने नागपंचमी साजरी होईल, असे म्हणायला हरकत नाही.
भारतात आजतागायत सापांच्या ३३५ प्रजाती आढळल्या असून, त्यातील २२० प्रजाती बिनविषारी आहेत. ४५ निमविषारी असून फक्त ७० साप विषारी आहेत. त्यातही नाग, मण्यार, घोणस, फुरसे या चार विषारी प्रजाती प्रामुख्याने महाराष्ट्रात सर्वत्र आढळतात. हे साप मानवास धोकादायक आहेत. निमविषारी व बिनविषारी सापांपासून मानवाच्या जीवितास कसलाच धोका नसतो.
- राहुल शिंदे, सर्पअभ्यासक, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.