सोलापूर : कामाच्या शोधात ते पुण्याला गेले... मिळेल ते काम त्यांनी तिथे सुरू केले... दोन मुली आणि पती- पत्नींचं कुटुंब कष्ट करून अगदी आनंदात जीवन जगत होते. मात्र, एकेदिवशी काम करताना कुटुंब प्रमुखाला विजेचा धक्का बसला आणि दोन्ही हात गेले. तेथून त्यांचा जगण्याचा पुन्हा संघर्ष सुरू झाला. 12 वर्षांपासून दोन हात नसताना ते भाजी विक्रीचा व्यवसाय करत आहेत.
अक्कलकोट तालुक्यातील हलोळीतील नागेश शिन्नुरे यांची ही काहणी आहे. भाजी विक्रीतून मिळालेल्या थोड्याफार पैशातून मुलांचे शिक्षण, घरं कसं चालवायचे हा त्यांचा प्रश्न आहे. हाताने होईल तेवढे काम ते करत आहेत. मात्र, मुलींना शिकवून त्यांना मोठं करायचे आहे. त्यासाठी त्यांना दानशूरांकडून मदतीची गरज आहे.
शिन्नुरे हे 1997 मध्ये कामाच्या शोधात ते पुण्याला गेले. तिथे त्यांनी बांधकाम कामगार म्हणून काम सुरू केले. एकेदिवशी काम सुरू असताना विजेचा धक्का बसून त्यांचे दोन्ही हात गेले. त्यानंतर असलेले काही पैसे उपचारासाठी गेले. गुण्यागोविंदाने सुरू असलेल्या त्यांच्या संसारात विरजण पडले. त्यांना सुरवातीला मदत कोणच केली नाही. तेव्हापासून आजपर्यंत त्यांची लढाई सुरू आहे. त्यावर त्यांनी हार न मानता भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. भाजी विक्री करत ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. नागेश हे अर्धवट हातांनी रोजीरोटीची जबाबदारी ओढत आहेत. पत्नी सुवर्णा त्यांना मदत करतात. त्यांची घरची परिस्थिती बिकट आहे. मात्र, हात नसताना परिस्थितीशी दोन हात करण्याची त्याची इच्छाशक्ती प्रबळ आहे.
कुटुंबाचे भागेना
काही दिवस पुण्यात हडपसर येथे रस्त्यावर भाजी विक्री व्यवसाय केला. मात्र, त्यावर कुटुंबाचे भागत नाही. दोन्ही हाताने काम करता येत नाही. पत्नी मदत करते पण, समाजातून काही मदत मिळाली तर मुलींची शिक्षणं करता येईल.
- नागेश शिन्नरे
इनेबल संस्थेकडून हात
प्रा. सुदीप उपाध्ये यांच्या प्रयत्नाने विज्ञान दिनी इनेबल संस्थेककडून शिन्नुरे यांना भारतातल्या पहिल्या थ्रीडी प्रिंट टेक्नॉलॉजी आधारित तयार केलेले हात बसवण्यात आले. याचा उपयोग त्यांच्या दैनंदिन कामकाजात होणार आहे. या हातांची बोटे हलवता येतात. यासाठी एबीएस आणि अन्य मटेरिअल वापरण्यात आले असल्याची प्रा. उपाध्ये यांनी सांगितले. अशा गरजू, कष्ट करणाऱ्या दिव्यांगानी मदतीसाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन प्रा. उपाध्य यांचे सहकारी प्रा. विक्रमसिंह बायस यांनी "सकाळ'शी बोलताना केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.