राष्ट्रीय क्रीडादिनाच्या पार्श्वभूमीवर तीन वेळा राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या वेदांत सुनिल चोरमले याच्याशी बातचित केली असता त्याने आपला प्रवास उलगडला.
सोलापूर: आर्मी, रेल्वे यांच्यासारख्या नामांकित संघातून कबड्डी खेळत भविष्यात आशियायी स्पर्धेत देशाचा प्रतिनिधी म्हणून कबड्डी स्पर्धेत सहभागी होण्याचे स्वप्न राष्ट्रीय कबड्डी खेळाडू वेदांत चोरमले याचे आहे.
राष्ट्रीय क्रीडादिनाच्या पार्श्वभूमीवर तीन वेळा राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या वेदांत सुनिल चोरमले याच्याशी बातचित केली असता त्याने आपला प्रवास उलगडला. आजोबा रामचंद्र बापूराव चोरमले हे देखील नामवंत कबड्डीपटू होते. घरात खेळाबद्दल अतिशय चांगले वातावरण वडील, चुलते, भाऊ सर्वजन वेगवेळ्या खेळांमध्ये प्रवीण आहेत. वडील सुनील चोरमले हे आर्मीच्या 9 महाराष्ट्र बटालियनमध्ये लिपिक पदावर कार्यरत आहेत. सिद्धेश्वर इंग्लिश मेडियम मध्ये दहावी झालेला वेदांत आता सर परशुराम भाऊ महाविद्यालय पुणे येथे अकारावी शास्त्र शाखेत शिकतोय. घरातच खेळाडूची परंपर असल्याने शास्त्र शाखेत शिक्षण घेत असूनही त्याने वेळ काढून सराव सुरू ठेवला आहे.
वेदांतचा प्रवास वयाच्या दहाव्या वर्षी सुरू झाला. पार्क मैदानावर श्रीराम स्पोर्ट क्लबच्या मरगू जाधव, सुवर्णा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांने कबड्डीचा सराव सुरू केला. राष्ट्रीय स्पर्धेत तीन वेळा महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले आहे. आर्मी, रेल्वे यांच्या सारख्या नामाकिंत संघातून त्याला खेळायचे आहे. इतकेच नव्हे तर देशाचा प्रतिनिधी म्हणून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचे आहे.
नाकाचे हाड मोडले तरी नाही खचला
सहा महिन्यांपूर्वी "खेलो इंडिया गेम' च्या कॅम्पमध्ये सराव करताना नाकाचे हाड मोडल्याने विश्रांती घ्यावी लागली. ऑपरेशननंतर आता त्याला कोणत्याही त्रासाशिवाय श्वसन करता येते. नाक कायमस्वरुपी वाकडे होऊनही वेदांतची खेळाबद्दलची आत्मियता थोडीही कमी झालेली नाही. त्यावेळी त्याला खेलो इंडियामधून वंचित राहावे लागले तरीही त्याला आंतरराष्ट्रीय स्पर्धा खुणावत आहेत.
कबड्डी हा सांघिक खेळ आहे. या खेळामुळे संघ भावना, खेळाडू वृत्ती वाढते. कबड्डीमुळे चांगला व्यायाम होतो. याशिवाय या खेळामुळे प्रसंगवधान राखणे, जिद्दीने यश मिळवण्यास शिकणे हे गुण अंगी बळावतात.
- वेदांत चोरमले, कबड्डीपटू
ठळक बाबी
- पार्क मैदानावर सरावाला प्रारंभ
- तीन वेळा राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग
- नाकाचे हाड मोडले तरी नाउमेद न होता प्रवास सुरूच
- घरातील प्रत्येकजण वेगवेगळ्या खेळात प्रवीण
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.