Maharashtra Politics : मोहिते-पाटलांची राजकीय कोंडी; अजित पवार, संजय शिंदे, उत्तम जानकर झाले सोबती

राष्ट्रवादीतील फूट : भविष्यात जिल्ह्याच्या राजकारणात शरद पवार व मोहिते-पाटील हे एक झाल्यास आश्‍चर्य वाटू नये.
political
politicalsakal
Updated on

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात माढा व करमाळ्याचे आमदार शिंदे बंधू, अकलूजचे मोहिते-पाटील ही दोन घराणी निर्णायक मानली जातात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये केलेली एन्ट्री अनेकांची राजकीय कोंडी करू लागली आहे.

मोहिते-पाटील यांचे राजकीय विरोधक म्हणून ओळख असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार संजय शिंदे, माळशिरसचे नेते उत्तम जानकर आता एकाचवेळी राज्यातील सत्तेच्या निमित्ताने मोहिते-पाटील यांचे सोबती झाले आहेत. त्यामुळे माळशिरस तालुक्यात, सोलापूर जिल्ह्यात आणि मुंबईत मोहिते-पाटलांची राजकीय कोंडी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद, जिल्हा बँक, स्थानिक स्वराज्य संस्थेची विधान परिषद निवडणूक यामध्ये मोहिते-पाटील व शिंदे यांची भूमिका निर्णायक मानली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्याच्या राजकारणात या दोन कुटुंबामध्ये असलेला संघर्ष आता रंजक वळणावर आला आहे.

२०२४ ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांचा समावेश झाला. सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदार संघ निर्माण झाल्यापासून (२००९) आजपर्यंत कायम चर्चेत आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढ्यातून २००९-२०१४, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी २०१४ -२०१९ असे राष्ट्रवादीचे दिल्लीत प्रतिनिधित्व केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेल्या आमदार संजय शिंदे यांचा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. माढ्यात राष्ट्रवादीला पहिल्यांदा हार मानावी लागली. या पराभवात मोहिते-पाटलांचा मोलाचा वाटा आहे.

political
Rajasthan Politics: महाराष्ट्रानंतर राजस्थानातही होणार राजकीय बंड? सचिन पायलट यांचं मोठं विधान

मोहिते-पाटलांनी माढ्यातून भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली. पण आज खासदार नाईक-निंबाळकर व मोहिते-पाटील यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचे दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आल्याने आमदार बबनराव शिंदे, आमदार संजय शिंदे, माजी आमदार दीपक साळुंखे,

माळशिरसचे नेते उत्तम जानकर यांच्या माध्यमातून खासदार निंबाळकर यांना सोलापूर जिल्ह्यातून मोठी ताकद मिळाली आहे. हीच ताकद मोहिते-पाटील यांच्यासाठी आगामी काळात डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

political
Maharashtra Politics: शिवसेना-भाजपमधील आमदारांच्या नाराजीवर चर्चा? शिंदे-फडणवीसांमध्ये रात्री खलबतं

माढ्याची उमेदवारी येऊ शकते पुन्हा चर्चेत

२०१९ च्या निवडणुकीत माढ्यातून रणजितसिंह मोहिते-पाटील यांना राष्ट्रवादीची उमेदवारी द्यावी, अशी मागणी होत होती. उमेदवारीचा तिढा सुटत नसल्याने त्यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांची गेल्या अनेक वर्षांपासून असलेली जोडी विभक्त झाली. २०२४ ची खासदारकी माढ्यातून लढण्यासाठी भाजपचा उमेदवार कोण? आणि भाजपच्या विरोधात उमेदवार कोण? हे प्रश्‍न जिल्ह्याच्या राजकारणातील रंजकता वाढविण्याची शक्यता आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा झेंडा बदला-बदलीचा राजकीय खेळ खेळला जाण्याची शक्यता आहे.

political
Nashik Political: भाजप, शिंदे की पवार गटाकडे नेतृत्व? बदलत्या राजकारणातून नाशिक लोकसभा मतदारसंघात पेच!

शरद पवारांनाही जिल्ह्यात नाही ठोस पर्याय

मोहिते-पाटील राष्ट्रवादी होते तोपर्यंत जिल्ह्यातील राष्ट्रवादी व्यवस्थित होती, अशी भावना आजही अनेकजण व्यक्त करत आहेत. अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडल्यानंतर ग्रामीण भागातील राष्ठ्रवादीचे बहुतांश नेते अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. त्यामुळे शरद पवार यांना सध्या तरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ठोस चेहरा दिसत नाही. पवार यांच्याकडे सोलापूर जिल्ह्यात नसलेला ठोस चेहरा व मोहिते-पाटील यांची भविष्यात राजकीय कोंडी होण्याची असलेली शक्यता यामुळे भविष्यात जिल्ह्याच्या राजकारणात शरद पवार व मोहिते-पाटील हे एक झाल्यास आश्‍चर्य वाटू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.