NCP Crisis: राष्ट्रवादीचा ‘हा’ असो की ‘तो’, दोन्ही गट सारखेच; एकाला पदाधिकारी मिळेना, दुसऱ्याला पदाधिकाऱ्यांमध्ये बदल दिसेना

अजित पवार सत्तेत सहभागी होऊन अडीच महिने झाले तरीही त्यांचा पक्ष पदाधिकाऱ्यांविना चालत आहे
NCP Crisis
NCP CrisisEsakal
Updated on

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील पदाधिकाऱ्यांमुळे पूर्वी (राष्ट्रवादी एकत्रित असताना) पदाधिकारी निवडीला विलंब लागला जात असल्याची कारणे सांगितली जात होती. उपमुख्यमंत्री पवार यांच्यामुळे राष्ट्रवादीत फूट पडली आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे खासदार शरद पवार यांच्यासोबत राहिले. (Latest Marathi News)

निर्णय प्रक्रिया वेळेत करण्याची कारणे संपली तरीही पदाधिकारी निवडीतील विलंब कमी झालेला नाही. राष्ट्रवादी शरद पवार यांची असो की उपमुख्यमंत्री अजित पवार यांची, दोन्ही राष्ट्रवादी निर्णय प्रक्रियेच्याबाबतीत सारखीच असल्याचे चित्र आहे.

NCP Crisis
Ajit Pawar: 'मंत्रिपदे केवळ मिरविण्यासाठी नाहीत', अजित पवारांकडून लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांची कानउघाडणी

शरद पवारांच्या शहर राष्ट्रवादीचे अध्यक्षपद भारत जाधव यांच्याकडे २०१५ पासून आहे. महिला अध्यक्षपद माजी नगरसेविका सुनीता रोटे यांच्याकडे २०१७ पासून आहे. नऊ वर्षे शहराध्यक्ष व सहा वर्षे महिलाध्यक्ष एकाच पदावर असल्याने इच्छुकांमध्ये मरगळ आली आहे. पदाधिकारी बदलाची चर्चा होते परंतु कार्यवाही काहीच होत नाही. ग्रामीणचे जिल्हाध्यक्षपद बळिराम साठे यांच्याकडे चार वर्षांपासून आहे.  (Marathi Tajya Batmya)

या ठिकाणी देखील बदल करावेत अशा हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यावेळी कोणता इच्छुक कोणत्या गटाचा हा प्रश्‍न सुटू न शकल्याने जिल्हाध्यक्षपदावर साठेच कायम राहिले आहेत. ग्रामीणमधील सर्वच आमदार, बहुतांश माजी आमदार व अनेक महत्त्वाचे नेते उपमुख्यमंत्री पवार यांच्यासोबत गेले आहेत. सामान्य कुटुंबातील पण जनमानसात प्रभावी असलेल्या व्यक्तींना पदांवर बसविण्याची संधी असतानाही पुन्हा शरद पवारांची राष्ट्रवादी निर्णय प्रक्रियेत का विलंब लावत आहे? याचे कोडे अनेकांना पडले आहे.

NCP Crisis
Chatrpati Sambhajinagar : स्वामी रामानंद तीर्थ यांचा दिल्लीत पुतळा,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

उपमुख्यमंत्री पवार सत्तेत सहभागी होऊन अडीच महिने झाले तरीही त्यांचा पक्ष पदाधिकाऱ्यांविना चालत आहे हे विशेष. भाजपने २०१५ ते आतापर्यंत तीन-तीन जणांना जिल्हाध्यक्ष/शहराध्यक्ष पदावर संधी दिली आहे. सत्तेचा लाभ सर्वांना देता येत नसला तरीही पक्षातील जबाबदारी देऊन कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण केली आहे. (Latest Marathi News)

भाजपचा ‘पार्टी विथ डिफन्स’चा हा फॉर्म्युला कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करणारा ठरत आहे. काँग्रेसने देखील पदाधिकारी बदल करून आगामी तयारी केलेली आहे. राष्ट्रवादीच्या बाबतीत मात्र अद्यापही जातीचा अन्‌ गटबाजीचा फॅक्टर दोन्ही ठिकाणी दिसत आहे.

NCP Crisis
Nashik Bribe Crime : चाळीसगाव उपविभागीय अभियंत्याला 4 लाखांची लाच घेताना अटक; नाशिकमध्ये 'लाचलुचपत'ची कारवाई

जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. २० सप्टेंबरपर्यंत या निवडींची घोषणा होईल. या निवडीनंतर साधरणत: महिनाभरात जिल्हा व शहरामधील महिला व युवक आघाडीच्या निवडी केल्या जातील. सोलापूरचे प्रभारी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार तर निरिक्षक म्हणून मी जबाबदारी सांभाळत आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीत संवादाची आणि नियोजनाची जबाबदारी माझ्यावर आहे. (Marathi Tajya Batmya)

- सुरेश घुले, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

सोलापू्र शहरातील रिक्त पदांवर १०० टक्के नियुक्त्या झाल्या आहेत. ग्रामीणमधील रिक्तपदांवर नियुक्त्या पदाधिकारी निवडीची प्रक्रिया अंतिम झाली आहे. या पदाधिकाऱ्यांची घोषणा फक्त बाकी आहे. ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष व सोलापूरचे शहराध्यक्ष चांगले काम करत आहेत. त्यामुळे हे पदाधिकारी बदलण्याबाबत सध्या तरी आमच्या अजेंड्यावर विषय नाही.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.