NCP Crisis : अजित पवार गटाला मंगळवेढ्यात धक्का; यू-टर्न घेत शहराध्यक्ष कौडूभैरी शरद पवार गटात दाखल

पक्षाच्या दृष्टीने अजित पवारांची भूमिका अयोग्य असली तरी मंगळवेढ्यात अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षवाढीचे काम करणार
ncp crisis chandrasekhar kondubhairi leave ajit pawar join  sharad pawar maharashtra politics
ncp crisis chandrasekhar kondubhairi leave ajit pawar join sharad pawar maharashtra politicssakal
Updated on

मंगळवेढा : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर अजित पवार गटात गेलेले राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चंद्रशेखर कौडूभैरी यांनी आठ दिवसांत यू- टर्न घेत परत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गटात सामील झाले. यामुळे मंगळवेढ्यातील अजित पवार गटाला हा धक्का मानला जात आहे.

तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बंडाचा पवित्रा घेत सत्ताधारी पक्षाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सलगी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत सत्ताधारी गटात प्रवेश केला.

यामुळे राज्यासह देशातील राजकारणात खळबळ उडाली. या घटनेनंतर महाविकास आघाडीची व्रजमूठ सैल झाल्याचा आरोप भाजपने केला.

ncp crisis chandrasekhar kondubhairi leave ajit pawar join  sharad pawar maharashtra politics
Dhule NCP News: राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी भावसार! अजित पवार यांच्याकडून धुळ्यात नियुक्तीच्या हालचाली

अजित पवार यांनी शपथ ग्रहण केल्यानंतर मंगळवेढ्यातील राष्ट्रवादीचे लतीफ तांबोळी, अरुण किल्लेदार, रामेश्वर मासाळ, शहराध्यक्ष चंद्रशेखर कौडूभैरी, सोमनाथ माळी यांनी अजित पवार यांना पाठिंबा देत सत्ताधारी गटात सहभाग नोंदवत अजित पवार यांनी विकासाच्या दृष्टीने घेतलेली भूमिका योग्य असल्याचे समर्थन केले.

तर रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा, युवकचे शहराध्यक्ष संदीप बुरकुल, विजय खवतोडे हे शरद पवारांच्या गटात राहिले. अजित पवार यांच्या निवडीनंतर शहरामध्ये अभिनंदनाचे डिजिटल फलक देखील लावले.

ncp crisis chandrasekhar kondubhairi leave ajit pawar join  sharad pawar maharashtra politics
Solapur : गरीब कुटुंबातील चिमुकल्यांच्या नशिबी एकच गणवेश

काही दिवसांतच शहराध्यक्ष चंद्रशेखर कौडूभैरी यांनी यू-टर्न घेत पवारांच्या गटात येण्याचा निर्णय घेत प्रतिज्ञापत्र देत स्वगृही परतले. शहराध्यक्ष कौडूभैरी यांनी सर्वपक्षीयांच्या बरोबरीने पोलिस निरीक्षकाविरोधात आंदोलन केले. त्यावेळी राष्ट्रवादीच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांना पाठबळ दिले नसल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली.

सुरवातीच्या काळात संभ्रमावस्थेमुळे आपण उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला पाठिंबा दिला होता. मात्र, राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून आम्ही शरद पवार यांना मानणारे आहोत. यापूर्वी युवक अध्यक्ष म्हणून काम केले. पक्षाच्या दृष्टीने अजित पवारांची भूमिका अयोग्य असली तरी मंगळवेढ्यात अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षवाढीचे काम करणार आहे.

- चंद्रशेखर कौडूभैरी, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.