२०२४ ला त्यांच्या हातात सत्ता गेली तर पुन्हा देशात निवडणुका हे नावच राहणार नाही. त्यासाठी आपण सावध राहिले पाहिजे.
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड, बंडखोरी नाही. काही जण वैयक्तिक स्वार्थासाठी पक्ष सोडून गेले आहेत. राष्ट्रवादी शरद पवारांचीच आहे, त्यामुळे शरद पवारांवर आमचा विश्वास आहे. पक्षातील काही लोक बाहेर पडले असतील, मात्र पक्षाचा सामान्य कार्यकर्ता पदाधिकारी शरद पवारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून इथेच आहे, असं स्पष्ट मत शेखर माने यांनी व्यक्त केलं.
काही नेते गेले म्हणून पक्ष जात नाही. पदाधिकारी गेले म्हणून पक्षाला काही फरक पडत नाही. एक गेला तर दुसरा येतो. त्यामुळे येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीत शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी एक नंबरवर राहील, असा विश्वासही निरीक्षक शेखर माने यांनी व्यक्त केला.
शरद पवार गटाच्या जिल्हा राष्ट्रवादीची पहिली बैठक छत्रपती संभाजी महाराज चौकातील फर्न हॉटेलच्या सभागृहात झाली. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष बळिराम साठे होते. यावेळी विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील, रमेश बारसकर, शहराध्यक्ष भारत जाधव, महिला अध्यक्ष कविता म्हेत्रे, जिल्हा महिला अध्यक्ष सुवर्णा शिवपुरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयमाला गायकवाड, महेश माने, प्रल्हाद काशीद, बिपिन करजोळे आदी उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष साठे म्हणाले, भविष्यात भाजपला देशात एकपक्षीय पद्धती आणायची आहे. त्यांनी सुरवातीला शिवसेना फोडली आता राष्ट्रवादी फोडली. इतर पक्षही फोडतील आणि देशांमध्ये आपलं बहुमत कसे होणार हे त्यांचे राजकीय षडयंत्र आहे.
२०२४ ला त्यांच्या हातात सत्ता गेली तर पुन्हा देशात निवडणुका हे नावच राहणार नाही. त्यासाठी आपण सावध राहिले पाहिजे. शरद पवार यांच्या पाठीशी आज आपण आहोत पण ज्यावेळी परीक्षा येईल, त्यावेळी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहील तोच सच्चा कार्यकर्ता असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.