'...तर कल्याणराव काळेंचा शिवाजी महाराज चौकात जाहीर सत्कार करू!'

'...तर कल्याणराव काळेंचा छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर सत्कार करू!'
'...तर कल्याणराव काळेंचा छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर सत्कार करू!'
'...तर कल्याणराव काळेंचा छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर सत्कार करू!'esakal
Updated on
Summary

सीताराम महाराज साखर कारखान्याच्या शेअर्सच्या रकमेवरून कल्याणराव काळे आणि दीपक पवार यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत.

पंढरपूर (सोलापूर) : खर्डी (ता. पंढरपूर) (Pandharpur) येथील सीताराम महाराज साखर कारखाना (Sitaram Maharaj Sugar Factory) उभारणीसाठी कल्याणराव काळे (Kalyanrao Kale) यांनी सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या माध्यमातून तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये घेतले आहेत. या दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांना कोणताच लाभ मिळाला नाही. शेअर्स म्हणून घेतलेले शेतकऱ्यांचे पैसे येत्या गुढी पाडव्यापर्यंत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केल्यास आपण स्वखर्चातून राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे यांचा छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर सत्कार करू, असे खुले आव्हान राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष दीपक पवार (Deepak Pawar) यांनी आज (मंगळवारी) येथे दिले.

'...तर कल्याणराव काळेंचा छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर सत्कार करू!'
Breaking ! सिद्धेश्‍वर कारखाना बंद करण्याचे प्रदूषण मंडळाचे आदेश

सीताराम महाराज साखर कारखान्याच्या शेअर्सच्या रकमेवरून कल्याणराव काळे आणि दीपक पवार यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे यांनी आपल्या खासगी सीताराम महाराज साखर कारखान्याची अलीकडेच विक्री केली आहे. त्यानंतर कारखाना उभारणीसाठी शेअर्स म्हणून घेतलेले पैसे परत द्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष दीपक पवार यांनी लावून धरली आहे. यावरून काळे-पवार यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.

अलीकडेच दीपक पवार यांनी कारखाना विक्रीची चौकशी करावी, अशी तक्रार ईडी व सीबीआयला दिली होती. त्यानंतर कल्याणराव काळे यांनी, दीपक पवार हे जाणूनबुजून साखर कारखाने अडचणीत यावेत यासाठी खोट्या तक्रारी करत असल्याचा आरोप करत, येत्या सहा महिन्यात शेतकऱ्यांचे पैसे परत करू, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर आज दीपक पवार यांनी पुन्हा काळेंच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत, सीताराम महाराज कारखान्यासाठी घेतलेले पैसे परत देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात आज पंढरपुरात शेअर्सधारक शेतकऱ्यांची बैठक पार पडली. शेतकऱ्यांचे पैसे परत मिळेपर्यंत आपण हा लढा सुरूच ठेवणार असल्याचे दीपक पवार यांनी बैठकीत सांगितले.

यावेळी श्री. पवार म्हणाले, कल्याणराव काळेंच्या कार्यकाळातच सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्यावर कर्जाचा डोंगर झाला. कोणत्या कारणासाठी त्यांनी कर्जाचा वापर केला हे सभासदांना सांगावे. शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर बॅंकेचे कर्ज काढून सीताराम महाराज साखर कारखान्यासाठी पैसे घेतले. 12 वर्षांनंतरही शेतकऱ्यांना ना सभासदत्व मिळाले ना पैसे. शेतकऱ्यांच्या पैशातून उभा केलेल्या या कारखान्याची विक्री केली आहे. विक्री केल्यानंतर तरी शेतकऱ्यांचे पैसे परत मिळणे अपेक्षित होते. परंतु पैसे परत मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे. शेतकऱ्यांचे शेअर्सचे पैसे व्याजासह परत मिळवण्यासाठी आपण हा लढा सुरू केला आहे. शेवटच्या शेतकऱ्याला पैसे मिळेपर्यंत हा लढा सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

'...तर कल्याणराव काळेंचा छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर सत्कार करू!'
Amazon अन्‌ Flipkart ला टक्कर देण्यासाठी Jio चा ऍक्‍शन प्लॅन!

यामध्ये कोणतेही राजकारण नाही. सभासदांनी डोळसपणे आपल्या हक्काचे पैसे मागावेत. शेतकऱ्यांचे पैसे परत मिळावेत यासाठी सीबीकडे लेखी तक्रार केली आहे. सीबीने दखल घेतली असून, चौकशीसाठी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. लवकरच कंपनी कायद्यानुसार कारवाई सुरू होईल. तरीही कल्याणराव काळे यांनी गुढी पाडव्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर त्यांचे पैसे व्याजासह जमा केल्यास आपण त्यांचा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर सत्कार करू, असेही पवार यांनी या वेळी जाहीर केले. पवारांचे हे आव्हान काळे स्वीकारणार का? याकडेच तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. बैठकीला 'विठ्ठल'चे माजी संचालक मधुकर गिड्डे, धनंजय पाटील, प्रकाश पाटील, अतुल करांडे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.