पंतप्रधान नरेंद्र मोदी काल सोलापूर दौऱ्यावर आले होते, यावेळी त्यांनी अनेक विकासकामांचे उद्घाटन केले. तसेच त्यांच्या हस्ते ९० हजार घराचे लोकार्पण देखील करण्यात आलं, यावेळी पंतप्रधान मोदींना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान आज सोलापूर दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रचे नेते शरद पवार यांनी यावर भाष्य केलं आहे. मोदींनी सोलापुरात मूळ प्रश्नाकडून दूर नेण्याचं काम केल्याची टीका त्यांनी केली आहे.
पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत सोलापूर येथे लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच माकप नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम हे देखील उपस्थित होते. दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या भाषणावेळी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं. मात्र त्यांनी नरसय्या आडाम यांची योग्य ती दखल घेतली नाही अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. तसेच सोलापुरातील कामगारांना घरं मिळालं हे पाहूण या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी अश्रू अनावर झाले, यावर देखील शरद पवारांनी भाष्य केलं.
राजकारणात पक्ष आणि विचारधारा वेगळी असते. पण हे विधायक काम वेगळी असतात. हे विधायक काम करणाऱ्या व्यक्तीबद्दल पंतप्रधान मोदी चार शब्द चांगले बोलले असते, त्यांना प्रोत्साहित केलं असतं तर ते शोभून दिसलं असतं. डावे-उजवे हे नेहमी मनात ठेवलं तर मग विधायक काम करणाऱ्यांना प्रोत्साहित करण्याची भूमिका हवीय ती बघायला मिळत नाही. ही काही गोष्ट चांगली झाली नाही, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.
शरद पवार म्हणाले की, याशिवाय हजारो लोक त्याठिकाणी आले होत. साहाजिक आहे, कारण १५ हजार घरे होते, एका घरातील ३ -४ लोक जरी आले तरी ५०-६० हजार लोक होतात. त्यामुळे एवढे लोक जमले म्हणून आमची लोकप्रियता आहे असं समजत असतील तर ते कितपत योग्य आहे याचा विचार त्यांनीच करावा असेही शरद पवार म्हणाले.
पंतप्रधान भावनाविवश झाले, हा त्यांचा वयक्तीक प्रश्न आहे. त्यांना असा निवारा मिळाला असता तर आनंद झाला असता असे त्यांनी स्पष्ट केलं. पण त्यावर मी काही भाष्य करणार नाही. एकाबाजूला निवारा देण्यासाठी ज्यांनी कष्ट केले त्यांचा विचार करण्याची आवश्यकता होती.
दुसरीकडे देशातील सर्वसामान्य जनतेच्या समोर विशेषतः तरुणांमध्ये असेलली बेकारी, सामान्य माणसांना कुटुंब चालवत असताना दिसणारी महागाई या दोन प्रश्नांचा ओझरता उल्लेख जरी केला असता तर ते अधिक योग्य झालं असतं. पण या प्रश्नांवर भाष्य न करता भावनाविवश होण्याची भूमिका घेत या प्रश्नाकडून लोकांना एका बाजूला घेऊन जाण्याचं काम पंतप्रधान मोदी यांन केलं अशी टीका शरद पवार यांनी केली.
सोलापूर शहर आणि जिल्ह्याचे काही प्रश्न आहेत. औद्यागिकीकरणासाठी इथे लक्ष देण्याची गरज आहे. मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि पालकमंत्री यांची ही जबाबदारी आहे की, सोलापूर ही एकेकाळची औद्योगीकस, कष्टकऱ्यांची नगरी आहे. जुन्या मील बंद झाल्या आहेत. येथे नवीन काहीतरी सुरू करण्याची गरज आहे. आज पुण्यात ४०-५० हजार तरूण कामासाठी जात आहेत. इथे औद्यगिकीकरणामध्ये अधिक लक्ष देण्याची गरज आहे. त्याही प्रश्नाकडे बघण्यात आलं नाही. पंतप्रधान, मुख्यमंत्री आले आणि गेले त्याचा इतरांच्या पदरात काय पडलं याचं समाधानकारक चित्र दिसत नाही असे शरद पवार म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.