करमाळा : करमाळा - माढा मतदारसंघातील रिटेवाडी उपसासिंचन योजना, बेंद ओढ्यासारखे सर्व प्रलंबित प्रकल्प मार्गी लावू, शेतकऱ्यांच्या विजेची व पाण्यासंदर्भातील कामे मार्गी लावण्यासाठी निवडणुकीनंतर मी स्वतः लक्ष घालून मार्ग काढणार आहे.
तुम्ही फक्त महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण पाटील यांना साथ द्यावी, असे जाहीर आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे केले.
महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण पाटील यांच्या प्रचारार्थ करमाळा येथे आयोजित सभेत पवार बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, भूषणसिंह होळकर, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप, सुनील सावंत, अॅड. राहुल सावंत, राजेंद्रसिंह राजेभोसले, बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, अप्पासाहेब झांजुर्णे, अतुल खुपसे, नवनाथ झोळ,
सुधाकर लावंड, प्रवीण कटारिया, संतोष वारे, प्रताप जगताप, यशपाल कांबळे, रामकृष्ण माने, सविताराजे भोसले, माजी सभापती अतुल पाटील, रवी पाटील, उस्मान तांबोळी, अल्ताफ तांबोळी, शंभूराजे जगताप, वैभवराजे जगताप, दादासाहेब लबडे, बालाजी जगताप, कल्याण चोपडे, सूरज भोसले, विष्णू जगताप, श्रीकांत गायकवाड, डॉ. अमोल घाडगे, महादेव कामटे, नलिनी जाधव, अॅड. सविता शिंदे उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, करमाळा आणि माढ्यातील जे आमदार आहेत. त्यांना आम्ही अनेक वर्षे मदत केली. लोकांचे प्रश्न सोडवू असा त्यांनी शब्द दिला होता. प्रामाणिकपणाने संघर्षात बरेाबर राहू, असेही सांगितले होते. पण आज ते कुठे गायब झाले आहेत हे कळत नाही. ते लोकहिताची जपणूक करतात, असा माझा समज होता.
पण त्यांनी स्व:हितापलीकडे काही पाहिले नाही. जे स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतात. त्यांना आपण यत्किंचितही सहकार्य करण्याची आवश्यकता नाही, अशा शब्दांत शरद पवार यांनी आमदार बबनराव शिंदे आणि संजय शिंदे यांच्यावर हल्लाबोल करत निवडणुकीत त्यांना कसलीही मदत नसल्याचे स्पष्ट केले.
माजी आमदार जयवंतराव जगताप म्हणाले, पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा तालुक्यातील रखडलेले प्रश्न निश्चित सोडवले जातील. करमाळा विधानसभा मतदारसंघाचा इतिहासाचा आहे. ज्या-ज्या उमेदवारासाठी शरद पवार साहेब प्रचारासाठी आले, ते सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे नारायणआबा पाटील हे आजच विजयी झाले आहेत.
शिंदे बंधूंच्या बाबतीत माझा अंदाज चुकला
माढा आणि करमाळा मतदारसंघातील आमदारांनी तेथील जनतेला सीना नदीत बॅरेज उभारण्याचा आणि पाणी सोडण्याचा शब्द त्यांनी दिला होता. लोक सांगतात की त्यांनी हा शब्द पूर्ण केला नाही. लोकांमध्ये जातो, शब्द देतो आणि त्याची किंमत करत नाही, त्यांनी मत मागण्याचा अधिकार गमावला आहे. शिंदे हे प्रामाणिकपणे जनतेच्या हिताची जपणूक करतात, असा माझ्यासारख्याचा समज होता. पण नंतरच्या काळात लक्षात आलं की, हे जे काही करतात, आपल्या स्वार्थाशिवाय दुसरे काहीच करत नाहीत.
#ElectionWithSakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.