Neelkanth bird : मंगळवेढा शिवारात नीळकंठ पक्षी दाखल...हिवाळी पाहुण्यांच्या आगमनाला सुरूवात
Neelkanth bird :मंगळवेढा शिवारात हिमालय पर्वतातील नीळकंठ पक्ष्याचे आगमन झाले आहे. यंदा चांगल्या पावसामुळे परदेशी पक्ष्यांना पोषक वातावरण उपलब्ध झाले आहे.
ब्रह्मपुरी(सोलापूर) : बऱ्याच वर्षांनंतर यंदा बरसलेल्या चांगल्या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश पाणस्थळे तुडुंब भरले आहेत. तसेच ओसाड माळराने हिरवाईने बहरली आहेत. खरीपाची पिके जोमाने वाढले आहेत व रब्बी हंगामातील पेरण्याने वेग धरला आहे .