चिखलठाण/जेऊर : शेतीसाठी उपयोगी अवजारे बनविणाऱ्या वडिलांना वर्कशॉपमध्ये वेल्डिंग, लेथ मशिनवर टर्निंग कामात मदत करत, जेऊर येथील श्रावणी कळसाईत हिने बारावी, नीट व सीईटी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
भविष्यात जिद्दीने आणि परिश्रम घेत, यशस्वी डॉक्टर बनवून रुग्णसेवा करत आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याची श्रावणीचा निर्धार आहे. लेथ मशिनवर चालणाऱ्या हातात रुग्णांना बरे करणारा स्टेथस्कोप घ्यायची तची इच्छा आहे.
जेऊर (ता. करमाळा) येथील बाबूराव कळसाईत यांचा श्रीनाथ इंजिनिअरिंग वर्क्स नावाने शेती उपयोगी अवजारे बनवण्याचा व्यवसाय आहे. ग्रामीण भागातील साधा वेल्डिंग कारागीर असणाऱ्या कळसाईत यांनी कोणतेही तांत्रिक शिक्षण नसताना अनुभवातून शेतीमध्ये उपयोगी अनेक नवीन अवजारांचे संशोधन करत स्वयंचलित अवजारांची निर्मिती करतात.
आपला व्यवसाय पाहत आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे त्यांचे विशेष लक्ष असून, मुलगी सुद्धा शिक्षण घेत असतानाच वडिलांच्या व्यवसायातही मदत करते. केवळ पुरुषांची मक्तेदारी समजले जाणारे वेल्डिंग करणे, लेथ मशिनवर लोखंडापासून विशिष्ट प्रकारची स्पेअरपार्ट तयार करण्याची कौशल्याची कामे ती सफाईदारपणे करते.
शिक्षण व अभ्यास करून उरलेल्या वेळात वडिलांच्या व्यवसायामध्ये ती मदत करते. तिने यावर्षीच्या बारावीच्या परीक्षेत ८७ टक्के गुण मिळवले आहेत, याबरोबरच नीट परिक्षेत ४३२ तर सीईटीमध्ये तीने ९७.४८ टक्के गुण मिळवत यश संपादन केले आहे.
तिच्या या यशामध्ये श्रीराम सायन्स ॲकॅडमी पानीव यांचेही योगदान महत्त्वाचे आहे. लहानपणापासून वेगवेगळ्या नवीन गोष्टी शिकण्याचा तिला छंद असून जबरदस्त निरीक्षण शक्ती असल्याने कोणतेही कौशल्य ती लवकर आत्मसात करते.
केवळ सोळा-सतरा वर्षीय मुलगी असूनही विविध कौशल्यात पारंगत आहे. लोखंडापासून शेती उपयोगी बनवण्यात येणारी विविध अवजारे तिला तयार करता येतात. ती सफाईदारपणे चारचाकी गाडी चालवते.
ट्रॅक्टर चालवते ट्रॅक्टरच्या साह्याने शेतातील विविध मशागतीची कामे करते अशा या श्रावणीने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत असून, विविध ठिकाणी तिचा सन्मान करण्यात येत आहे. जिद्द, कष्ट आणि परिश्रमाच्या जोरावर वैद्यकीय शिक्षण घेऊन यशस्वी डॉक्टर होत रुग्णसेवा करण्याचा तिचा मानस आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.