नवीन टॉवरची रेंज म्हणजे आगीतून उठून फुफाट्यात ! माळीनगर येथील मोबाईलधारकांची व्यथा 

Mobile tower
Mobile tower
Updated on

लवंग (सोलापूर) : माळीनगर, गट नंबर दोन येथे मोबाईलसाठी नवीन टॉवर उभारला गेल्यामुळे मोठ्या अपेक्षेने लोकांनी इतर कंपन्यांचे सीमकार्ड पोर्ट करून घेतले, तर अनेकांनी मोबाईलसाठी नवीन सीम घेतले. परंतु, नवीन टॉवर चालू झाल्यानंतरची मिळणारी रेंज पाहिली तर "आगीतून उठून फुफाट्यात पडलो' अशी अवस्था मोबाईल ग्राहकांची झाली आहे. 

याबाबत कंपनीकडे बोलायचे कोणाला, असा प्रश्न या ग्राहकांसमोर पडला असून, कंपनीच्या सेवेबद्दल कमालीची नाराजी व्यक्त केली जात आहे. माळीनगर, गट नंबर दोन येथे झगडे यांच्या घरावर जिओ कंपनीने तीन महिन्यांपूर्वी 500 मीटर परीघ क्षमतेचा टॉवर उभा केला. या टॉवरचे काम चालू असताना आता आपल्या जवळच टॉवर उभा होत असल्याने चांगल्यापैकी रेंज मिळेल, या अपेक्षेने अनेक मोबाईल धारकांनी आपले इतर कंपन्यांचे जुने नंबर पोर्ट करून जिओमध्ये वर्ग केले. तसेच अनेकांनी नवीन सीम घेतले. महिनाभरापूर्वी हा टॉवर कार्यान्वित झाल्यानंतर रेंजची परिस्थिती पाहिली तर पहिली स्थिती बरी होती, अशी म्हणण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. 

मोबाईल फोन न लागणे, फोन लावला तर "कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे' असे सांगितले जाणे, मधूनच फोन कट होणे, आवाज व्यवस्थित न जाणे हा प्रकार अजूनही चालू असल्याने नवा टॉवर होण्याचा फायदा काय, असा प्रश्न ग्राहक स्वतःलाच विचारून कंपनीबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत. 

नवीन टॉवर तांबवे गावातील टॉवरवरून लिंक केला आहे; परंतु या दोन टॉवरच्या मध्ये दोन झाडे येत असल्यामुळे रेंज मिळण्यास अडथळा येतो आहे, असे कंपनीचे अधिकारी सांगताहेत. परंतु हा अडथळा झाडे तोडून कोणी दूर करायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे, तो अद्याप सुटलेला नाही. हा प्रश्न केव्हा सुटेल आणि चांगली सेवा कधी मिळेल, अशी विचारणा केली जात आहे. अधिकारी झाडांचे कारण सांगून आपली जबाबदारी झटकत आहेत. 

तांबवे आणि माळीनगर गट नंबर दोन या दोन टॉवरमध्ये ज्या झाडांचा अडथळा निर्माण झाला आहे त्यामुळे रेंज मिळत नाही हे खरे आहे; परंतु त्यावर झाडे तोडणे हाच एकमेव पर्याय आहे. झाडे तोडल्याशिवाय ही अडचण निवारण होऊ शकत नाही. झाडे आम्ही तोडू शकत नाही. त्यासाठी आता तांबवे ऐवजी माळीनगर येथील टॉवरवरून गट नंबर दोन येथील टॉवर लिंक करण्याबाबत प्रयत्न करू. 
- रमेश बेलापुरे, 
सिनिअर नेटवर्क इंजिनिअर, 
जिओ कंपनी 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.