विधान परिषदेसाठी नऊ मतदार अपात्र! भाजपकडून प्रशांत परिचारकच?

विधान परिषदेसाठी नऊ मतदार अपात्र! भाजपकडून प्रशांत परिचारकच?
विधान परिषद
विधान परिषदCanva
Updated on
Summary

तत्पूर्वी, निवडणूक आयोगाने या निवडणुकीसाठी 75 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक मतदार आहेत का, याचा आढावा घेतला.

सोलापूर : विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक (MLA Prashant Paricharak) यांची मुदत नोव्हेंबरमध्ये संपणार आहे. तत्पूर्वी, निवडणूक आयोगाने (Election Commission) या निवडणुकीसाठी 75 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक मतदार आहेत का, याचा आढावा घेतला. त्यानुसार जिल्ह्यातील 419 मतदारांपैकी नऊ सदस्य अपात्र ठरले आहेत. विविध कारणास्तव काहींचे सदस्यत्व रद्द झाले असून काहींचा मृत्यू झाला आहे.

विधान परिषद
पीककर्जासाठी बॅंकांची अट! एवढे 'सिबिल' असेल तरच मिळणार कर्ज

विधान परिषदेसाठी जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतीच्या सदस्यांसह पंचायत समित्यांच्या सभापतींना मतदानाचा अधिकार असतो. दरम्यान, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांचा पराभव करून प्रशांत परिचारक यांनी विजय मिळवला होता. विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असाच संघर्ष पाहायला मिळणार आहे. सोलापूर महापालिकेवर भाजपची सत्ता असून त्या ठिकाणी सर्वाधिक नगरसेवक भाजपचे आहेत. पंढरपूर, बार्शी, मंगळवेढा, माळशिरस तालुक्‍यातही भाजपचे सर्वाधिक सदस्य आहेत. विधान परिषदेसाठी जवळपास 300 मतदान आमच्या बाजूचे असल्याचा दावा भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे म्हणाले, तिन्ही पक्षांचे मिळून महाविकास आघाडीचे जिल्ह्यात जवळपास 110 पर्यंत मतदार आहेत. दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरीही स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे वेगळीच असतात. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचेच पारडे जड असल्याचे सध्याचे चित्र आहे.

विधान परिषदेसाठी 410 मतदार

विधान परिषदेसाठी 419 मतदारांपैकी नऊजण अपात्र ठरले असून 410 मतदार या निवडणुकीत मतदानाचा अधिकार बजावतील. निवडणूक आयोगाने या निवडणुकीसाठी 75 टक्‍क्‍यांपर्यंत मतदान आहे का, यासंदर्भात माहिती घेतली आहे.

- भारत वाघमारे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक), सोलापूर

विधान परिषद
जनसंवाद यात्रेतून कॉंग्रेस अस्तित्व शोधण्याच्या प्रयत्नात !

प्रशांत परिचारकांना दुसऱ्यांदा लॉटरी?

भाजपकडून विद्यमान आमदार प्रशांत परिचारकच निवडणूक लढविणार, हे निश्‍चित असून त्याची अधिकृत घोषणा पुढील काही दिवसांत होणार आहे. पंढरपूर- मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत परिचारकांच्या साथीने समाधान आवताडे यांचे आमदारकीचे स्वप्न पूर्ण झाले. त्याची परतफेड म्हणून परिचारक यांनाच उमेदवारी मिळणार हे निश्‍चित आहे. मात्र, राष्ट्रवादीकडून अजूनही उमेदवार निश्‍चित झाला नसून कोणाची चर्चादेखील नाही. त्यामुळे महाविकास आघाडीकडून कोण असणार विधान परिषदेचा उमेदवार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()