Solapur : रेल्वे प्रवाशांनी ऊन, पावसात थांबायचे कुठे?

कुर्डुवाडी रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ३-४ वर नाही कव्हरशेड
Kurduwadi Railway Station
Kurduwadi Railway Station sakal
Updated on

कुर्डुवाडी : सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाचे जंक्शन असलेल्या कुर्डुवाडी रेल्वे स्थानकावरून मोठ्या संख्येने प्रवासी ये-जा करतात, परंतु फलाट क्रमांक ३-४ वर ऊन व पावसापासून बचाव होण्यासाठी पुरेसे कव्हरशेड नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. पुरेसे कव्हरशेड उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.

कुर्डुवाडी रेल्वे स्थानकावरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. रेल्वे स्थानकावर चार फलाट आहेत. त्यापैकी फलाट क्रमांक १ व २ वर कव्हरशेड आहेत. परंतु त्या फलाटांची लांबी व रुंदी पुरेशी नाही. जास्त डब्यांची संख्या असलेल्या गाडीला फलाट क्रमांक एक व दोन अपुरे पडतात. त्यामुळे जास्त डबे असलेल्या गाड्या शक्यतो फलाट क्रमांक ३ - ४ वर येतात. फलाट क्रमांक १-२ वर पुरेसे कव्हरशेड असले तरी नवीन झालेल्या ब्रीजच्या पुढे चार ते पाच डबे थांबतात त्या भागातही कव्हरशेड नाही.

Kurduwadi Railway Station
Railway Baby Berth : नंदुरबारच्या देवरे दाम्पत्यांचा झेंडा अटकेपार; बेबी बर्थच्या चाचणीला सुरवात!

फलाट क्रमांक ३-४ वर ब्रीजजवळ दोन्ही बाजूला १०० ते १५० मीटरच्या भागात कव्हरशेड नाही. त्यामुळे प्रवाशांना ब्रीजवरच थांबावे लागते. विशेषतः उन्हाळ्यात कडक उन्हात प्रवाशांनी गाडीची वाट पाहत कुठे थांबायचे हा प्रश्न आहे. सध्या उन्हाळा सुरू असल्याने दुपारच्या वेळी कडक उन्हामुळे प्रवासी ब्रीजवर थांबतात. त्यामुळे फलाट क्रमांक ३-४ वर गाडी फलाटावर येईपर्यंत प्रवाशांअभावी शुकशुकाट असतो. पावसाळ्यात तर प्रवाशांचे खूप हाल होतात.

Kurduwadi Railway Station
Central Railway : खूशखबर! रेल्वे बोर्डाकडं पाठवला सिकंदराबाद-कोल्हापूर गाडीचा प्रस्ताव, प्रवाशांना होणार फायदा

वारी काळात भाविकांचे मोठे हाल

बार्शी, माढा, मोडनिंब, टेंभुर्णी, परांडा परिसरातील प्रवासी दूर प्रवास करण्यासाठी कुर्डुवाडी रेल्वे स्थानकावरून करतात. त्यामुळे या प्रवाशांना थांबण्यासाठी कव्हरशेड गरजेचे आहे. आषाढ, कार्तिक, माघ, चैत्र वारीच्या कालावधीत राज्यातून नव्हे तर परराज्यातून अनेक भाविक रेल्वे स्थानकावर येतात. फलाट क्रमांक १-२ वर पाय ठेवण्यास जागा नसते. भाविकांचे हाल होतात. फलाट क्रमांक ३-४ वर कव्हरशेड उभे केल्यास ते निवाऱ्यासाठी तेथे थांबू शकतात.

कुर्डुवाडी शहर व परिसरातील अनेक प्रवासी रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर कव्हरशेड करावे. पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कव्हरशेड बरोबरच इतर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

- आकाश लांडे, मनसे, करमाळा-माढा विधानसभा अध्यक्ष, कुर्डुवाडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()