Solapur School News : वेळ न बदलल्याने ९४ शाळांच्या मुख्याध्यापकांना नोटिसा

कारवाईच्या इशाऱ्यानंतर अनेकांनी बदलली वेळ; ज्यांना अडचणी त्यांची सोमवारी बैठक
Notice to principal of 94 schools for non-change of time of first to fourth class meeting on monday
Notice to principal of 94 schools for non-change of time of first to fourth class meeting on mondaySakal
Updated on

सोलापूर : शासनाच्या ८ फेब्रुवारी २०२४च्या आदेशानुसार आणि प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या १, २९ व २८ मार्च २०२४च्या पत्रानुसार सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या पूर्व प्राथमिक ते इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊनंतर भरणे अपेक्षित आहे. तरीदेखील शहरातील ६७ तर उत्तर सोलापूर तालुक्यातील २७ शाळांनी आदेश डावलला.

शिक्षणाधिकाऱ्यांकडून कारवाईची नोटीस बजावताच त्यातील अनेक शाळांनी वेळेत बदल केला, पण अद्याप काही शाळांनी वेळ बदलेली नाही. त्यांची सोमवारी (ता. २२) बैठक बोलावण्यात आली आहे.

पूर्व प्राथमिक व इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊनंतरच भरविण्यात याव्यात, रात्री चिमुकल्यांची पुरेशी झोप व्हावी, त्यांच्यातील चिडचिडेपणा वाढणार नाही, याची दक्षता घेत शालेय शिक्षण विभागाने त्यासंदर्भातील आदेश काढला. त्या आदेशाचे पालन करणे सर्वच आस्थापनांच्या शाळांसाठी बंधनकारक आहे.

मात्र, अनेक शाळांना त्या निर्णयाची अंमलबजावणी करणे मुश्कील आहे. त्यांनी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना अडचणीसंदर्भातील कागदपत्रे सादर करून त्यानुसार रीतसर परवानगी घेणे बंधनकारक आहे. परंतु, अनेक शाळांनी वेळ न बदलता व शिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी न घेता पूर्वीच्या वेळेनुसारच शाळा भरविणे सुरू ठेवले आहे.

या पार्श्वभूमीवर आता संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना नोटिसा बजावून चार दिवसांत खुलासा मागविला आहे. दरम्यान, वेळ बदलली म्हणणाऱ्या शाळांनी खरोखर वेळेत बदलला का, याची पडताळणी वस्तुनिष्ठ पद्धतीने होतेय का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नोटीस बजावल्यानंतर वेळ बदललेल्या शाळा

१) कुमठे केंद्र : पंचशील प्राथमिक शाळा, ल.अ.खमितकर विद्यालय, शमा उर्दू प्राथमिक शाळा, लिटल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल (कुमठे), रूक्माई आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल, बिबि हयात उर्दू प्राथमिक शाळा, संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा, गजानन प्राथमिक शाळा, बालभारती प्राथमिक विद्यालय,

ज्ञानसंपदा प्राथमिक शाळा, अल हुसेन उर्दू प्राथमिक शाळा, छ. शिवाजी प्राथमिक शाळा, प्रणितीताई शिंदे प्राथमिक शाळा, राष्ट्रविकास प्राथमिक शाळा (कुमठे), नॅशनल उर्दू मराठी प्राथमिक शाळा, आयडियल उर्दू प्राथमिक शाळा, सुरवसे प्राथमिक शाळा.

२) शेळगी केंद्र : नेताजी सुभाष प्राथमिक शाळा, राजर्षी शाहु महाराज प्राथमिक शाळा, वीरतपस्वी बालक मंदिर, वीरतपस्वी इंग्लिश मीडियम स्कूल, अरिहंत इंग्लिश मीडियम स्कूल, महाराष्ट्र उर्दू प्राथमिक शाळा, सोलापूर सोशल असोसिएशन उर्दू प्राथमिक शाळा.

३) बाळे केंद्र : राजीव प्राथमिक शाळा

४) मार्डी केंद्र : डॉ. भोजने इंग्लिश मीडियम स्कूल

शहरातील ६७ शाळांचा निर्णय सोमवारी

शहरातील जवळपास ६७ शाळांनी शासनाच्या व प्रशासनाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही त्यांच्या अडचणींमुळे वेळेत बदल केलेला नाही. त्या शाळांना वेळेत बदल करण्यास नेमक्या काय अडचणी आहेत, यासंदर्भात सोमवारी प्रशासनाधिकारी जावीर शेख यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीला प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख देखील उपस्थित असणार आहेत. त्यावेळी शहरातील किती शाळांनी सकाळी नऊनंतरची वेळ स्वीकारलेली नाही, हे समोर येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.