Senior Citizen Helpline: ज्येष्ठांना आता ३६१ दिवस १४५६७ ‘या’ हेल्पलाइनचा आधार! आनंदी जीवन हेच ध्येय्य

ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण व त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणे, वृद्धांची काळजी घेण्यासाठी सामाजिक न्याय, सबलीकरण मंत्रालयाने देशभरातील ज्येष्ठांसाठी सर्व राज्यांमध्ये १४५६७ ही राष्ट्रीय हेल्पलाइन सेवा सुरु केली आहे. वर्षातील ३६१ दिवस ही सेवा सुरु राहणार आहे.
Senior Citizen Helpline
Senior Citizen Helplinesakal
Updated on

सोलापूर : ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण व त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणे, अत्याचारग्रस्त वृद्धांची काळजी घेण्यासाठी सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाने देशभरातील ज्येष्ठांसाठी सर्व राज्यांमध्ये १४५६७ ही राष्ट्रीय हेल्पलाइन सेवा सुरु केली आहे. वर्षातील ३६१ दिवस ही सेवा सुरु राहणार आहे.

राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि जनसेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाइन चालवली जात असल्याची माहिती प्रकल्प व्यवस्थापक स्मितेश शहा यांनी सांगितले.

देशातील ज्येष्ठांच्या तक्रारींचे निवारण करून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे, अत्याचारग्रस्त वृद्धांची विशेष काळजी घेणे हा त्यामागील हेतू आहे.

महाराष्ट्रात ज्येष्ठांसाठीची ही राष्ट्रीय हेल्पलाइन ‘जनसेवा फाउंडेशन’द्वारे चालवली जात आहे. हेल्पलाईनद्वारे आरोग्य, जागरूकता, निदान, उपचार, निवारा, वृद्धाश्रम घरे, डे केअर सेंटर, पोषण विषयक, ज्येष्ठांसंबंधी अनुकूल उत्पादने, सांस्कृतिक, आध्यात्मिक, कला, करमणूक यासंदर्भातील माहिती दिली जाते.

त्यामध्ये कायदेविषयक मार्गदर्शन, विवाद निराकरण, पेन्शन संबंधित मार्गदर्शन, क्षेत्रीय पातळीवर मदत, बेघर, अत्याचारग्रस्त वृद्ध, हरवलेल्या व्यक्तींची सेवा व काळजी घेण्यासाठी हेल्पलाइन कार्यरत केली आहे.

अडचणीतील ज्येष्ठांना १४५६७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, जेणेकरून वृद्ध व्यक्तींना वेळेत मदत करून त्यांची काळजी घेता येईल, असे आवाहनही प्रकल्प व्यवस्थापक शहा यांनी केले आहे.

हेल्पलाइनची वैशिष्टे

  • हेल्पलाइनची वेळ सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत असेल

  • वर्षातील ३६५ दिवसांपैकी २६ जानेवारी, १५ ऑगस्ट, २ ऑक्टोबर व १ मे या दिवशी हेल्पलाइन बंद असेल.

  • ज्येष्ठ नागरिकांना १४५६७ या क्रमांकावरून मिळणार कोणत्याही प्रकारची मदत

  • हेल्पलाइनसाठी सर्व जिल्हा पातळीवर क्षेत्रीय प्रतिनिधी (FRO) नियुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.