ग्रामीण भागातील कोरोना रोखण्यासाठी आता ग्रामस्तरीय समित्या !

आता ग्रामीण भागातील कोरोना रोखण्यासाठी ग्रामस्तरीय समित्या
Corona
CoronaMedia Gallery
Updated on

सोलापूर : शहरातील कोरोनाची दुसरी लाट (Second wave of corona) कमी झाल्यानंतरही ग्रामीण भागातील कोरोना (Covid-19) रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. या पार्श्‍वभूमीवर आता ग्रामस्तरीय समितीवर (Village level committee) गावातील कोरोना रोखण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तलाठ्यांच्या अध्यक्षतेखालील या समितीच्या माध्यमातून गावातील संशयितांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. तर परजिल्ह्यातून अथवा परगावातून गावात येणाऱ्यांची माहिती संकलित करून त्यांच्यावरही वॉच ठेवण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप (CEO Dilip Swami) स्वामी यांनी दिले आहेत. (Now village level committees to prevent corona in rural areas)

Corona
कोरोनातून बरे झालेल्यांना घेता येईल तीन महिन्यांनंतर लस !

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Collector Milind Shambharkar) यांनी ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा या हेतूने गावोगावी ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्या समितीचे अध्यक्ष गावातील तलाठी तर सचिव ग्रामसेवक असणार आहेत. तसेच सदस्य म्हणून पोलिस पाटील, विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव, बचत गटाचे प्रतिनिधी, आरोग्य सेवक व कृषी सहाय्यक असणार आहेत. जिल्ह्यातील एक हजार 28 गावांमध्ये या समित्या स्थापन केल्या आहेत. समितीच्या सर्व सदस्यांनी त्यात योगदान देणे बंधनकारक आहे. या समित्यांशी आज (मंगळवारी) सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत संवाद साधला जाणार आहे. संशयितांची कोरोना चाचणी, त्यांचे वेळेत निदान, परगावातून येणाऱ्यांवर लक्ष ठेवणे, घरोघरी जाऊन सर्व्हे करून नागरिकांची माहिती घेणे, यातून निश्‍चितपणे कोरोनाचा संसर्ग कमी होईल, असा विश्‍वास मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केला.

Corona
"राजीनामा देऊन आरक्षण मिळणार असेल तर लगेच देईन !'

ग्रामस्तरीय समितीचे प्रमुख कार्य...

  • गावातील नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळावेत यादृष्टीने नियोजन करणे

  • गावात सामूहिक कार्यक्रम होणार नाहीत याची दक्षता घेणे

  • गावातील खासगी डॉक्‍टरांवर वॉच ठेवून कोरोनाची लक्षणे असलेल्यांची चाचणी करण्याला प्राधान्य देणे

  • परजिल्ह्यातून अथवा परगावातून आलेल्या व्यक्‍तीची वैद्यकीय तपासणी करणे

  • बेशिस्त तथा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे, प्रसंगी गुन्हा दाखल करणे

ग्रामीण भागातील कोरोना रोखण्याची जबाबदारी आता ग्रामस्तरीय समितीवर सोपविली असून त्या समितीने काटेकोर नियोजन करायचे आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व सदस्यांशी ऑनलाइन संवाद साधला असून, त्यांच्या सूचना जाणून त्यानुसार उपाययोजना केल्या जातील. ग्रामस्तरीय समितीच्या पारदर्शक कामातून निश्‍चितपणे कोरोना कमी होईल.

- दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.