Voter ID Update : मतदार नोंदणी अन्‌ मतदारसंघात बदल आता घरबसल्या

मतदारांना भरावे लागतील फॉर्म क्रमांक सहा, सात अन् आठ; ईव्हीएमची तपासणी सुरू
मतदार नोंदणी अन्‌ मतदारसंघात बदल आता घरबसल्या
मतदार नोंदणी अन्‌ मतदारसंघात बदल आता घरबसल्याsakal
Updated on

सोलापूर : विधानसभेच्या अनुषंगाने मतदार यादी अंतिम करण्याची कार्यवाही सुरू असून ६ ऑगस्टला प्रारूप यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर २० ऑगस्टपर्यंत हरकती, आक्षेप, सूचना मागविल्या जाणार असून ३० ऑगस्टला अंतिम मतदार यादी जाहीर होईल.

मतदारांना नाव वगळण्यासाठी फॉर्म नंबर सात, नवीन नाव नोंदणीसाठी फॉर्म नंबर सहा आणि मतदारसंघात बदल किंवा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यातील नावनोंदणीसाठी फॉर्म नंबर आठ भरावा लागणार असून ते अर्ज मतदारांना घरबसल्या भरता येतील.

सप्टेंबरच्या मध्यावधीत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होईल, असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. त्यादृष्टीने सध्या प्रशासकीय पातळीवरील तयारी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीसाठी वापरलेले ‘ईव्हीएम’चाच वापर विधानसभा निवडणुकीसाठी केला जाणार आहे. त्या सर्व मशिनची प्रथमस्तरीय तपासणी १ ऑगस्टपासून सुरू झाली आहे.

मतदार नोंदणी अन्‌ मतदारसंघात बदल आता घरबसल्या
Raj Thackeray In Solapur: पंतप्रधानांकडून भेदभाव होतोय...; राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींवर डागली तोफ

१० सप्टेंबरपर्यंत प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण झाल्यावर पुन्हा सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर मशिनची तपासणी होईल. तत्पूर्वी, मतदार यादी अंतिम केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या आठ दिवस अगोदर देखील नवीन मतदारांना मतदार यादीत नाव नोंदवता येणार आहे. याशिवाय एखादा मतदार दुसऱ्या मतदारसंघात रहायला गेला असल्यास त्याला मतदारसंघात बदल देखील करता येणार आहे.

फॉर्म नंबर सहा, सात, आठ नेमका काय?

  • फॉर्म नंबर सहा : नवीन नाव नोंदणी करण्यासाठी मतदारांना voters.eci.gov.in व voter helpline app यावर सोय आहे. त्यासाठी केवळ रहिवासी पुरावा व जन्म तारखेचा पुरावा लागतो.

  • फॉर्म नंबर सात : मृत किंवा कायमचे स्थलांतरित झालेल्यांसाठी हा अर्ज करावा लागतो. मतदार मृत झाला असल्यास त्याचा मृताचा दाखला व स्थलांतरित झालेला असल्यास त्याला नवीन ठिकाणचा रहिवासी पुरावा जोडून अर्ज करावा लागतो.

  • फॉर्म नंबर आठ : एका मतदारसंघातून दुसऱ्या मतदारसंघात किंवा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात गेलेल्या मतदारांना त्याठिकाणी मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी हा अर्ज भरून द्यावा लागतो. त्यावेळी केवळ तो जेथे रहायला आहे तेथील पुरावा द्यावा लागतो.

मतदार नोंदणी अन्‌ मतदारसंघात बदल आता घरबसल्या
Solapur Rain Update : सिध्दापूर वडापूर बंधारा पाण्याखाली, पुर्व भागाचा संपर्क तुटला

विधानसभा निवडणुकीसाठी मतदार यादी अंतिम करण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे. ज्यांनी मतदार यादीत नाव नोंदविलेले नाही, त्यांनी लवकर नोंदवून घ्यावे. दुसरीकडे निवडणुकीसाठी लागणाऱ्या ‘ईव्हीएम’ची प्रथमस्तरीय तपासणी देखील सध्या सुरू झाली असून ती १० सप्टेंबरपर्यंत चालेल.

- गणेश निऱ्हाळी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.