बेगमपूर- माचणुर येथील जुना पूल बनला धोकादायक

जुन्या पुलाची स्ट्रक्चरल ऑडिट व्हावी, अशी मागणी जनतेतून होत आहे
 Old bridge at Begumpur Machanur become dangerous solapur
Old bridge at Begumpur Machanur become dangerous solapur
Updated on

ब्रह्मपुरी (सोलापूर) - सोलापूर -कोल्हापूर प्रमुख राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या बेगमपूर - माचणुर येथील जुन्या पुलास संरक्षक कठडे नसल्यामुळे हा पूल येणाऱ्या जाणाऱ्यासाठी मृत्यूच्या खाईत असल्यासारखे दृश्य निर्माण झाले आहे. बस चालकाचा तोल गेल्यामुळे नर्मदा नदीवरील दुर्घटनेची पूर्णावर्ती इतर पुलावर होऊ नये यासाठी जुन्या पुलाची स्ट्रक्चरल ऑडिट व्हावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.

नवीन फुल हा वाहतुकीस राष्ट्रीय महामार्गाने खुला केला असला तरी जुन्या पुलावरून प्रवासी वर्गाची वाहतूक, पादचारी प्रवासी वर्ग, बाजारपेठेत येणारे जाणारी सततची दुचाकी वाहने, शाळेची विद्यार्थी याची सतत ये-जा असते. पहिल्याच पावसामध्ये या पुलावरून पाणी साचल्यामुळे येण्या -जाण्यासाठी प्रवासी वर्गाची दाणादान उठली असून हा पुल धोकादायक असल्यामुळे पाऊले मोजत पुलावरील अंतर कापावे लागत आहे. दोन्ही बाजूने पुलावरील नसणारे संरक्षक कठडे तसेच पुलावरील पडलेले भेगा तसेच जड वाहतुकीमुळे हा पुल मृत्यूस आमंत्रण देत असल्याचे दिसत असून राष्ट्रीय महामार्ग अधिकारी डोळे झाक करत चक्क दुर्लक्ष करीत आहे.

ब्रह्मपुरी , माचणुर, रहाटेवाडी, मुंडेवाडी व बठाण आदी गावातील प्रवासी वर्गाची सततची रेलचेल असून बेगमपूर प्रमुख बाजारपेठेत खरेदीसाठी व इतर कामासाठी येत असतात. पुलावरील असणारा अरुंद रस्ता ,संरक्षण कटडे, दोन्ही बाजूस असणारे झाडे झुडपे यामुळे वाहनधारकास जीव मुठीत घालून ह्या धोकादायक पुलावरून प्रवास करावा लागत आहे. बेगमपूर जुन्या पुलावरून शाळेसाठी येणारे विद्यार्थ्यांना पुलाची झालेलीअवस्था बघून मृत्यूचे आमंत्रण घेत पुलावरून भीतीपोटी सावकाश चालावे लागत आहे. जुन्या पूलावरील संरक्षण कठडे बसवून डाग डुजी करावी तसेच भविष्यात होणाऱ्या अपघातापासून सुटका मिळावी अशी पालक वर्गातून सुर उमटत आहे व त्वरित पुलाची दुरुस्ती करून द्यावी अशी मागणी या परिसरातील जनतेतून होत आहे.

"बेगमपुर व माचणुर येथे शाळेसाठी विद्यार्थीची जुन्या पुलावरून सतत ये-जा करीत असतात तरी राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांनी संरक्षक कठडे बसवून पुलाची तपासणी करावी भविष्यात होणारी दुर्घटना टाळावी."

- असलम चौधरी, सभापती बाजार समिती मोहोळ.

"जुन्या पुलावरून लोकल वर्दळ चालू आहे परंतु मूळ टेंडर मध्ये जुन्या पुलाची दुरुस्ती नाही तरीही ठेकेदारास संरक्षक कठडे बसवून जुन्या पुलाची दुरुस्ती लवकर करण्यास सांगत आहोत."

- महेश जगदाळे, राष्ट्रीय महामार्ग अधिकारी ,सोलापूर.

" संध्याकाळच्या वेळी नवीन पुलाचे पथ दिवे बंद असतात. व्यावसायिकांना किराणा माल आणण्यासाठी बाजारपेठेत सतत जावे लागते . भीमा नदीवरील जुना पुल अंधारात असतो त्यामुळे रात्रीच्या वेळी दोन्ही बाजूचे कठडे ,संरक्षक पाईप दिसत नाही.तरी राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्याने तातडीने जुन्या पुलाची दुरुस्ती करून घ्यावी. "

- अतुल पाटील, हॉटेल व्यावसायिक, ब्रह्मपुरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.