सोलापूर : ओमिक्रॉन सौम्य तर डेल्टा घातकच

तिसऱ्या लाटेत सौम्य लक्षणांच्या रुग्णांची संख्या अधिक
delta plus
delta plusesakal
Updated on
Summary

तिसऱ्या लाटेत सौम्य लक्षणांच्या रुग्णांची संख्या अधिक

सोलापूर : सध्या रुग्णालयात दाखल होणारे ओमिक्रॉन सदृश्‍य(omicron patient) रुग्णांची संख्या जास्त असली तरी हे रुग्ण अगदीच तीन ते पाच दिवसात बरे होत आहेत. पण त्यासोबत डेल्टा व्हायरसचे रुग्ण(delta virus patients) मात्र अजुनही प्रभावी उपचाराशिवाय बरे होत नसल्याचे दिसून येत आहे. शहरात तिसऱ्या लाटेत(third wave of corona) जे रुग्ण दाखल होत आहेत त्यामध्ये दहापैकी ८ ते ९ रुग्ण हे ओमिक्रॉनसदृश्‍य प्रकारचे आहेत. या प्रकारच्या रुग्णांमध्ये सीटीस्कॅन किंवा एक्‍सरेमध्ये फुप्फुसामध्ये संसर्ग(lungs) दिसत नाही. या रुग्णांच्या लक्षणाची तीव्रता अतिशय कमी असल्याने उपचारही सौम्य व बरे होण्याचा कालावधी सध्यातरी कमी आहे. हे रुग्ण लवकर बरे होत आहेत. (Omicron is mild but delta is dangerous)

delta plus
याचि डोळा देखिला सिद्धरामेश्‍वरांचा अक्षता सोहळा!

मात्र, दहा रुग्णांपैकी एक ते दोन रुग्ण डेल्टाचे असल्याचे दिसून येते आहे. या रुग्णांच्या एक्‍सरेमध्ये फुप्फुसातील संसर्ग पाहण्यास मिळतो. तसेच दुसऱ्या लाटेतील रुग्णांमध्ये जी गंभीर लक्षणे दिसत होती ती या रुग्णांत दिसून येत आहे. त्यांना अधिक औषधोपचार करावा लागत आहे. डेल्टाचा संसर्ग धोकादायक मानला जातो.

delta plus
मानकऱ्यांच्या साक्षीने अक्षता सोहळा संपन्न; पाहा व्हिडिओ

अँटीबॉडी कॉकटेल सर्वात प्रभावी

डेल्टासारख्या गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना सध्या ॲटीबॉडी कॉकटेल अत्यंत उपयुक्त ठरत आहे. त्या डबलडोसची किमंत १ लाख २० हजार रुपये एवढी आहे. मात्र, त्याचे उपचारातील परिणामदेखील खूपच चांगले मिळत आहेत. मधुमेह, रक्तदाब व इतर आजार असलेल्या रुग्णांना डेल्टसदृष्य गंभीर संसर्ग असलेल्या रुग्णांना तत्काळ धोक्‍यातून बाहेर येण्यासाठी हे औषध उपयोगी ठरते आहे.

delta plus
दिड्डम्‌... दिड्डम्‌... सत्यम्‌... सत्यम्‌..! अक्षता सोहळा संपन्न

नविन औषध मोल्लोफ्लेवोपीर

या पूर्वीच्या लाटेत फ्लेवोपीर या गोळीचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला गेला आहे. मात्र त्यानंतर आता मोनोफ्लेवोपीर ही नवीन गोळी बाजारात उपलब्ध झाली आहे. त्याचा उपयोग प्राथमिक लक्षणे दिसल्यानंतर लगेच उपचारासाठी केला जाणार आहे. अन्य औषधांमध्ये अद्याप संशोधने सुरु आहेत.

डेल्टा अजुनही एंडमिक

डेल्टासदृश्‍य विषाणू(delta varient) जो की, संसर्गाच्या बाबतीत गंभीर परिणाम करणारा आहे. हा डेल्टा अजुनही साथीच्या स्थितीत (एंडमिक) आहे. सर्वसाधारण पणे विषाणू संसर्गजन्य अवस्थेतून स्पोरॅडिक म्हणजे तुरळक संसर्गाच्या स्थितीत जातो. पण डेल्टासदृश्‍य विषाणूच्या बाबतीत अजून हा बदल झाला नाही. हा बदल झाला तर त्याच्या संसर्गाचे प्रमाण कमी होऊ शकते.

सध्या दाखल होणाऱ्या कोरोनासदृष्य रुग्णांमध्ये बहुतांश रुग्णांमध्ये कोरोना संसर्गाचे छातीच्या एक्‍सरेमध्ये(chest x-ray) दिसून येणारा फुप्फुसामधील(lungs) संसर्ग दिसून येत नाही. मात्र, काही रुग्णांत दुसऱ्या लाटेतील गंभीर रुग्णांप्रमाणेच गंभीर लक्षणे दिसून येत आहेत.

- डॉ. निर्मलकुमार तापडीया, फिजिशयन, आश्‍विनी रुग्णालय, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.