Pandharpur: पंढरपुरात झालं वारकऱ्यांचं आगमन; प्रमुख चौकांमध्ये..!

ऊन, वारा, पाऊस यांचा कोणताही परिणाम होणार नाही.
Pandharpur: पंढरपुरात झालं वारकऱ्यांचं आगमन; प्रमुख चौकांमध्ये..!
Updated on

Pandharpur: पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने शहर सुशोभीकरण करण्यासाठी प्रमुख चौकांमध्ये वारकरी वेशातील २० पुतळे उभारण्यात आले आहेत. हे पुतळे उभारल्याने पंढरीच्या वैभवात भर पडली असून पंढरीत आलेल्या भाविक भक्तांसह स्थानिक नागरिकांचे देखील आकर्षण ठरले आहेत.

Pandharpur: पंढरपुरात झालं वारकऱ्यांचं आगमन; प्रमुख चौकांमध्ये..!
Pandharpur : चंद्रभागा नदी शुद्धीकरणाचे काम ‘नमामि चंद्रभागा’तून हाती घेण्यात आले असून तिसऱ्या टप्प्याला मंजुरी मिळण्याची अपेक्षा

पंढरपूर नगरपालिकेने चौक सुशोभीकरण योजनेतून सुमारे ५० लाख रुपये खर्चून शहरातील प्रमुख चौकातील रस्ता दुभाजकाच्यामध्ये दिंडीतील वारकऱ्यांचे २० पुतळे उभारले आहेत. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, इंदिरा गांधी चौक, सावरकर चौक, लहुजी वस्ताद चौक परिसरामध्ये हाती भगवा झेंडा, वीणा, टाळ, मृदुंग वादन करीत असलेले वारकरी, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेली महिला व सोबत बाल वारकरी यांचे पुतळे उभारले आहेत.

Pandharpur: पंढरपुरात झालं वारकऱ्यांचं आगमन; प्रमुख चौकांमध्ये..!
Pandharpur : पंढरपुर विठ्ठल मंदिर परिसरातील कॉरिडॉरचे काम ‘जैसे थे’

हे पुतळे कर्नाटक मधील रायचूर येथील शिल्पकार अय्यन गौडा पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी साकारले आहेत. जणू काही आपल्यासमोरून प्रत्यक्ष वारकऱ्यांची दिंडी चालली आहे असे भासावे अशा अप्रतिम पुतळ्यांची निर्मिती या कुशल शिल्पकाराने पंढरीत साकार केली आहे. याशिवाय शिल्पकार श्री.पाटील यांनी कोल्हापूर जवळील कणेरी मठ, इस्लामपूर, बारामतीमध्ये विविध शिल्प निर्मिती केली असून मुंबईतील जोगेश्वरी येथे मातोश्री शिल्पग्राम उभारले आहे.

मातोश्री शिल्पग्राममध्ये तब्बल १३० पुतळे व भव्य प्रवेशद्वार उभारले आहे. तर कणेरी मठामध्ये बारा बलुतेदारांचे दैनंदिन जीवन हुबेहूब साकारले आहे. इस्लामपूर मध्ये तर किसान पार्क, गोवर्धन पर्वत, बोगदा व त्यातून चाललेली रेल्वे, बारामती येथील पाटस रोडवर दिंडी सोहळ्याचे शिल्प उभारले आहे. दरम्यान पंढरीतील प्रमुख चौकांमध्ये उभारण्यात आलेल्या या वारकरी संप्रदायातील वैविध्यपूर्ण पुतळ्यामुळे पंढरीच्या आध्यात्मिक वातावरणामध्ये भर पडली असून विविध चौकांचे सुशोभीकरण झाले आहे.हे पुतळे स्थानिक नागरिकांसह श्री विठ्ठल दर्शनासाठी पंढरीत आलेल्या भाविक भक्तांचे देखील आकर्षण ठरले आहे.

Pandharpur: पंढरपुरात झालं वारकऱ्यांचं आगमन; प्रमुख चौकांमध्ये..!
Pandharpur News : माढ्याच्या उमेदवारीचा सस्पेन्स कायमच; उमेदवारी देण्याचा अधिकार पार्लमेंटरी बोर्डाला

सुशोभीकरणासाठी बसविण्यात आलेले पुतळे हे सिमेंट,स्टील, वाळू वापरून काँक्रीट पासून बनवले आहेत. पुतळ्यांना अपेक्स कलरचा वापर करून रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्यामुळे किमान पाच ते सात वर्ष पुतळ्यांवर ऊन, वारा, पाऊस यांचा कोणताही परिणाम होणार नाही.

-अय्यन गौडा पाटील, शिल्पकार

पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने शहरातील प्रमुख चौकांचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. त्याकरिता वारकरी वेशातील २० पुतळे बसवण्यात आले आहेत. शहर सुशोभीकरण संदर्भात पंढरपूर मधील सुजाण नागरिकांनी नगरपालिका प्रशासनास सूचना कराव्यात असे आवाहन करीत आहे.

-डॉ. प्रशांत जाधव, मुख्याधिकारी, पंढरपूर नगरपालिका

Pandharpur: पंढरपुरात झालं वारकऱ्यांचं आगमन; प्रमुख चौकांमध्ये..!
Pandharpur News : माढ्याच्या उमेदवारीचा सस्पेन्स कायमच; उमेदवारी देण्याचा अधिकार पार्लमेंटरी बोर्डाला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.