अक्कलकोट-निमगाव रोडवर झालेल्या अपघातात एक ठार, एक जखमी

Accident
AccidentAccident
Updated on

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट-निमगाव रोडवरील नवीन झालेल्या बायपास मार्गावर एरटिगा कार व मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला तर कारमधील एक जण जखमी झाला आहे. हा अपघात बुधवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अक्कलकोट-निमगाव मार्गावर झाला. त्याच्या अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की या अपघाताची फिर्याद पत्नी वंदना देविदास हंचाटे वय 51 वर्षे रा.सेंट्रल चौक अक्कलकोट यांनी उत्तर पोलिसांना दिली. या अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव देविदास हरिबा हंचाटे वय 55 वर्षे रा.सेंट्रल चौक अक्कलकोट असे आहे. यातील मयत व्यक्तीची शेती निमगाव रोडला आहे. शेती पाहण्यासाठी ते रोज मोटरसायकलवरुन येवुन जाऊन करीत असत. आज बुधवारी सकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास नवीन बायपास रोडवरील निमगावला जाणाऱ्या रोडवर शेरीकर चौक येथे एरटिगा कार क्रमांक एमएच 03 डीके 0428 चा चालक स्वप्निल गणेश पावनकर रा.कुर्ला,मुंबई याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात वाहन चालवुन समोरून येणाऱ्या मोटारसायकलला (क्र.एमएच 13 ए.यू 3675) जोराची धडक दिल्याने मोटरसायकलवरील देविदास हंचाटे गंभीर जखमी होऊन मयत झाले. या अपघातात मोटरसायकल व कारचे दीड लाख रुपयाचे नुकसान झाले.

अपघात झाल्यानंतर देविदास हंचाटे याना रुग्णवाहिकेतून सरकारी दवाखान्यात नेण्यासाठी नंणद उषा हंचाटे,श्रीकांत झिपरे,आशिष दुरुगकर,रेवानसिद्ध उंब्रानिकर,सचिन नडगिरे,रोहन भागानगरे,सूनील कटारे,नजीर शेख,अजित शेख आदींनी मदत केली. शेतीसह टेलर काम करणाऱ्या हंचाटे यांची परिस्थिती बेताचीच आहे. कुटुंबाचा कर्ता माणूस गेल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. कारचा वाहन चालक स्वप्निल गणेश पावनकर याच्यावर उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मुजावर हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.