Solapur : मोहोळ तालुक्यात वीज अंगावर पडून एक अंगणवाडी मदतनीस, चार गाईंचा मृत्यू

सायंकाळी वीज जोरात कडकडली नारळाच्या झाडावर कोसळली
one women and four cow death due to electricity power in mohol solapur
one women and four cow death due to electricity power in mohol solapursakal
Updated on

मोहोळ : सोमवार ता 22 रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मोहोळ तालुक्यात झालेल्या वादळी वारे व विजेच्या कडकडाटा मुळे अंगावर वीज पडून एका महिलेचा तर चार गाईंचा मृत्यू झाला.

सूत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार, सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मोहोळ तालुक्याच्या काही भागात वादळी वारे व विजेचा कडकडाट सुरू झाला. त्याच वेळी रिमझिम पावसाने हजेरी लावली.

खुनेश्वर ता मोहोळ येथील रामकृष्ण नामदेव घाडगे वय 65 हे त्यांची बहीण सुदामती व सून सुवर्णा ज्योतिबा घाडगे हे सर्व जण शेतात कामासाठी गेले होते. सायंकाळी साडेपाच वाजता पावसाचे वातावरण तयार झाल्याने सुधामती व सुवर्णा या दोघी घराकडे निघाल्या होत्या.

one women and four cow death due to electricity power in mohol solapur
Solapur : करमाळ्याचे DYSP विशाल हिरेंची पिंपरी चिंचवड सहाय्यक आयुक्त पदी बदली तर अजित पाटील नवे DYSP

अचानक जोरदार वीज कडाडली व ती सुवर्णा हिच्या अंगावर कोसळली. त्यावेळी सुवर्णा जागेवरच बेशुद्ध झाली तातडीने तिला उपचारासाठी मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तीला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेची फिर्याद रामकृष्ण घाडगे यांनी मोहोळ पोलिसात दिली आहे.

दुसरी घटना नजीक पिंपरी ता मोहोळ येथे घडली. सोमवारी सायंकाळी वादळी वारे व विजेच्या कडकडाटा मुळे येथील अरुण अण्णा पाटील यांच्या मालकीच्या तीन देशी खिलार गाईवर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे सुमारे दोन लाख रुपयाचे नुकसान झाले. कृष्णदेव अण्णा पाटील व शिवाजी प्रकाश वाघमोडे यांना विजेचा शॉक बसल्यासारखे झाले आहे.

one women and four cow death due to electricity power in mohol solapur
Solapur Water Issue : तीन दशकांपासून नियमित पाण्यासाठीच संघर्ष

तिसरी घटना पेनुर ता मोहोळ येथे घडली. येथील मारुती सदाशिव माळी यांनी सावलीसाठी त्यांची जर्सी गाय लिंबाच्या झाडाखाली बांधली होती. सायंकाळी जोरदार वीज कडाडली ती अगोदर लिंबाच्या झाडावर पडली व नंतर गाईवर पडली,

त्यामुळे जर्सी गाईचा जागीच मृत्यु झाला, त्यांचे एक लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. चौथी घटना येवती ता मोहोळ येथे घडली. सायंकाळी वीज जोरात कडकडली व भाऊ बाळासाहेब गोडसे यांच्या नारळाच्या झाडावर ती कोसळली मात्र त्या ठिकाणी जीवित हानी झाली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.