शहर-जिल्ह्यात काय चालू व काय बंद ! वाचा सविस्तर

सोलापूर शहर व जिल्ह्यात अत्यावश्‍यक सेवेतील दुकानांनाच परवानगी
Lockdown
LockdownEsakal
Updated on
Summary

शहर-जिल्ह्यातील अत्यावश्‍यक सेवेतील दुकानांनाच परवानगी मिळाली असून, 15 जूननंतर अन्य दुकानांबाबत निर्णय होणार आहे.

सोलापूर : शहरातील कोरोनाचा (Covid-19) संसर्ग कमी झाला, परंतु ग्रामीण भागातील रुग्णसंख्या अजूनही कमी झाली नसून मृत्यूदरही चिंताजनक आहे. या पार्श्‍वभूमीवर ग्रामीण भागात अत्यावश्‍यक सेवा वगळून अन्य कोणत्याही दुकानांना परवानगी न देण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी घेतला. तर तोच निर्णय महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर (Solapur Municipal Corporation Commissioner P. Shivshankar) यांनी शहरासाठी लागू केला आहे. रुग्ण व मृत्यूदर पाहून 15 जूननंतर अन्य दुकानांबाबत निर्णय घेतला जाणार आहे. (Only essential service shops are allowed in Solapur city and district)

Lockdown
"तिसऱ्या लाटेपूर्वी 12 ते 18 वयोगटासाठी लसीकरणाचा प्रयत्न !'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी लॉकडाउनमधील (Lockdown) कडक निर्बंधात शिथिलता देताना शहराची एकूण लोकसंख्या 10 लाखांहून अधिक असावी, त्या ठिकाणी एकूण ऑक्‍सिजन बेडपैकी 40 टक्‍के बेड रिकामे असावेत, पॉझिटिव्ह दर 10 टक्‍क्‍यांपेक्षा कमी असावा, असे निकष लावले. त्यानुसार सोलापूर शहराची (Solapur City) लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 10 लाखांपेक्षा कमी असल्याने ग्रामीण व शहरासाठी एकच निर्णय घेण्यात आला. तत्पूर्वी, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे (Commissioner of Police Ankush Shinde), महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांची बैठक पार पडली. त्या वेळी कोरोनाची लाट आटोक्‍यात येत असतानाच रिस्क घेणे परवडणारे नाही. शहरालगत असलेल्या दक्षिण व उत्तर सोलापूर, अक्‍कलकोट, मोहोळ या तालुक्‍यांचा मृत्यूदर सर्वाधिक असून पंढरपूर, बार्शी, माळशिरस, माढा, करमाळा या तालुक्‍यात रुग्णवाढ मोठी आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पूर्वीप्रमाणेच निर्बंध असावेत आणि शहरासाठीही तोच निर्णय असावा, असा निर्णय ठरला. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री साडेदहा वाजता त्यासंबंधीचा आदेश काढला.

Lockdown
21 वर्षीय सरपंच कोमल करपेंच्या कोरोनामुक्त पॅटर्नची मुख्यमंत्र्यांनी केले भरभरून कौतुक

आदेशानुसार कोणती दुकाने सुरू राहणार...

  • किराणा दुकाने, भाजीपाला, डेअरी, बेकरीसह अन्य खाद्यपदार्थांच्या दुकानांना सकाळी सात ते अकरापर्यंतच परवानगी

  • रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना पार्सल व घरपोच सेवेसाठी सकाळी सात ते रात्री आठपर्यंत दिली मुभा

  • हॉटेल, बार, रेस्टॉरंट राहणार बंदच, पण होम डिलिव्हरी व पार्सल सेवेला परवानगी

  • सार्वजनिक वाहतूक, टॅक्‍सी, बससेवा सुरू होईल; पण प्रवाशांची मर्यादा पूर्वीप्रमाणेच पाळावी लागणार

  • विवाहासाठी 25 व्यक्‍तींची मर्यादा; विवाह समारंभातील कर्मचाऱ्यांकडे कोरोना चाचणीचा रिपोर्ट बंधनकारक

  • परीक्षांना सवलती, 12 वी परीक्षेसाठी सवलत मात्र परीक्षेसंबंधित सर्वांना कोरोनाची चाचणी करण्याची अट

काय बंद राहणार...

  • शहर-जिल्ह्यातील सलून दुकाने उघडण्यास परवानगी नाहीच

  • मंदिरे, धार्मिक स्थळांना परवानगी नाहीच; नियम पाळून नित्यपूजा करता येईल

  • सिनेमागृहे, नाट्यगृहे व मनोरंजनाची कोणतीही सेवा सुरू राहणार नाही

  • अत्यावश्‍यक सेवेतील दुकाने वगळता अन्य कोणत्याही दुकानांना परवानगी नाही

  • आदेशातून शेतकऱ्यांना दिलासा

पावसाळ्याच्या तोंडावर आता शेतीच्या कामाला वेग येतो. त्यामुळे शेतीशी निगडित सेवा आणि कृषी उत्पादनाविषयक सर्व सेवा सुरळीत राहण्यासाठी बियाणे, खते, कृषी अवजारे, त्याची दुरुस्ती या दुकानांना सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत परवानगी राहील, असे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.