दोन्ही लस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच कॉलेजमध्ये प्रवेश!

दोन्ही लस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच कॉलेजमध्ये प्रवेश! हॉस्टेलमध्ये एका खोलीत एकच विद्यार्थी
Students
Studentssakal
Updated on
Summary

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची टांगती तलवार कायम आहे. या पार्श्‍वभूमीवर उच्च शिक्षण विभागाने सावध भूमिका घेत महाविद्यालये पूर्वीप्रमाणे उघडण्यावरील निर्बंध कायम ठेवले आहेत.

Summary

सोलापूर : कोरोनाची (Covid-1) दुसरी लाट ओसरल्यानंतर बुधवारपासून (ता. 20) उच्च महाविद्यालये (College) सुरू होणार आहेत. मात्र, नियमित पद्धतीने वर्गात तास होणार नसून केवळ प्रात्यक्षिकासाठीच परवानगी असणार आहे. दुसरीकडे, कोरोनावरील प्रतिबंधित लसीचे (Covid Vaccine) दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच कॉलेजमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. त्यासंबंधीचे पत्र पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने (Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University) सर्व प्राचार्यांना पाठविले आहे.

Students
UGC ने जाहीर केली NET पात्र उमेदवारांसाठी भरती!

कोरोनावरील प्रतिबंधित लसीकरण युद्धपातळीवर सुरू असून राज्यातील जवळपास सात कोटींहून अधिक व्यक्‍तींनी लस टोचून घेतली आहे. लसीकरणामुळे नागरिकांमध्ये सामूहिक रोगप्रतिकारक शक्‍ती निर्माण झाल्याचे अनेक जिल्ह्यांमधील सिरो सर्व्हेतून समोर आले आहे. तरीही, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची टांगती तलवार कायम आहे. या पार्श्‍वभूमीवर उच्च शिक्षण विभागाने सावध भूमिका घेत महाविद्यालये पूर्वीप्रमाणे उघडण्यावरील निर्बंध कायम ठेवले आहेत. सायन्स, इंजिनिअरिंग यासह अन्य अभ्यासक्रमांच्या प्रात्यक्षिकास परवानगी दिली आहे. त्यासाठी 20 विद्यार्थ्यांची बॅच करावी लागणार आहे.

प्रात्यक्षिक वगळता उर्वरित अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीनेच शिकवावा, अशा सूचना विद्यापीठाकडून प्राध्यापकांना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येकाने कोरोनावरील प्रतिबंधित लस टोचून घेणे आवश्‍यक असल्याचेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. कॉलेजमध्ये प्रवेश केल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडील लस टोचल्याचा पुरावा विभागप्रमुखांना अथवा प्राचार्यांकडे द्यावा लागणार आहे. हे निकष विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीच केल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 20 ऑक्‍टोबरपासून सर्व महाविद्यालयांचे प्रात्यक्षिक सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कॉलेजला येणाऱ्या प्रत्येक मुलाने कोरोनावरील प्रतिबंधित लस टोचलेली असणे आवश्‍यक आहे.

- डॉ. सुरेश पवार, प्रभारी कुलसचिव

Students
दक्षिण मध्य रेल्वेमध्ये 4103 अप्रेंटिस पदांची जम्बो भरती!

ठळक बाबी...

  • 20 ऑक्‍टोबरपासून केवळ प्रात्यक्षिकास परवानगी; उर्वरित अभ्यासक्रम ऑनलाइनच

  • प्रात्यक्षिकावेळी गर्दी होऊ नये म्हणून 20 विद्यार्थ्यांचे गट करावेत

  • विद्यापीठ अथवा महाविद्यालयांमधील हॉस्टेलमध्ये एका खोलीत एकच विद्यार्थी असावा

  • हॉस्टेलमधील खोल्यांची संख्या अपुरी पडत असल्यास सुरवातीला अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना द्यावा प्रवेश

  • कॉलेजला येणाऱ्या प्रत्येक मुलाने कोरोनावरील प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस टोचलेले असावेत

  • प्रतिबंधित लसीचा एक डोस घेतलेल्या विद्यार्थ्याला प्रात्यक्षिकास परवानगी द्यायची की नाही, याचा निर्णय प्राचार्य घेतील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()