SP सातपुतेंचे ऑपरेशन परिवर्तन! रोजगार मेळाव्यातून १०० जणांना नोकरी

जिल्ह्याला हातभट्टी दारूमुक्त करण्याच्या निमित्ताने पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सुरू केलेल्या ‘ऑपरेशन परिवर्तन’ अंतर्गत आज (शनिवारी) उद्योजक राम रेड्डी यांच्या उपस्थितीत दुसरा रोजगार मेळावा पार पडला. ११ कंपन्यांच्या प्रतिनिधींनी १०० तरुणांच्या मुलाखती घेतल्या.
opration parivartan
opration parivartanesakal
Updated on

सोलापूर : जिल्ह्याला हातभट्टी दारूमुक्त करण्याच्या निमित्ताने पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सुरू केलेल्या ‘ऑपरेशन परिवर्तन’ अंतर्गत आज (शनिवारी) उद्योजक राम रेड्डी यांच्या उपस्थितीत दुसरा रोजगार मेळावा पार पडला. ११ कंपन्यांच्या प्रतिनिधींनी १०० तरुणांच्या मुलाखती घेतल्या.

opration parivartan
काँग्रेस, शिवसेनेची स्वबळाची तयारी! ‘या’ प्रमुख कारणामुळे फिस्कटणार महाविकास आघाडी

जिल्ह्यातील मुळेगाव तांड्यासह इतर तांड्यांवरील हातभट्टी दारू निर्मिती व विक्रीचा अवैध व्यवसाय समूळ नष्ट व्हावा, यासाठी पोलिस अधीक्षक सातपुते यांनी एक मोहीम हाती घेतली. त्याअंतर्गत ४८० जणांनी अवैध व्यवसाय सोडून समाजमान्य व्यवसाय सुरू केला आहे. तर हातभट्टी दारू निर्मिती करणाऱ्यांच्या मुलांना रोजगार मिळावा, पारधी समाजातील व पोलिस पाल्यांनाही नोकरी मिळावी म्हणून त्यांनी यापूर्वी मोठा रोजगार मेळावा घेतला होता. त्यावेळी ९०० जणांना नोकरीची संधी मिळाली होती. आता पुन्हा रोजगार मेळावा आयोजित करून १०० तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. चिंचोळी एमआयडीसीतील उद्योग भवनात पार पडलेल्या या रोजगार मेळाव्याला पोलिस अधीक्षकांसह अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती, सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनचे सचिव वासुदेव बंग, उपाध्यक्ष गणेश सुत्रावे, सहसचिव रामेश्वरी गायकवाड, कार्यकारी सदस्य तारासिंग राठोड, शिवशंकर आंधळकर आदी उपस्थित होते.

opration parivartan
पदभरतीवरील ‘वित्त’चे निर्बंध उठले! राज्यात ९० हजार पदांची मेगाभरती शक्य

दोन दिवसांत मिळणार नियुक्तिपत्र
पोलिस अधीक्षकांच्या ‘ऑपरेशन परिवर्तन’अंतर्गत आयोजित रोजगार मेळाव्यात मुलाखत दिलेल्या तरुणांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार दोन दिवसांत नियुक्तिपत्र मिळणार आहे. यावेळी पोलिस उपअधीक्षक ज्योतिराम गुंजवटे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुहास जगताप, पोलिस निरीक्षक अरुण फुगे, राखीव पोलिस निरीक्षक आनंद काजूळकर व पोलिस उपनिरीक्षक सुबोध जमदाडे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.