पंढरपूर परिसरातील तरुणांना विमा प्रतिनिधी होण्याची संधी!

पंढरपूर परिसरातील तरुणांना विमा प्रतिनिधी होण्याची संधी!
पंढरपूर परिसरातील तरुणांना विमा प्रतिनिधी होण्याची संधी!
Canva
Updated on
Summary

थेट मुलाखतीद्वारे टपाल जीवन विमा, ग्रामीण टपाल जीवन विमा प्रतिनिधी म्हणून निवड झालेल्या उमेदवारांना टपाल खात्यामार्फत आंतरिक प्रशिक्षण दिले जाणार आहे.

पंढरपूर (सोलापूर) : टपाल जीवन विमा योजना (Postal life insurance plan) व ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेअंतर्गत (Rural Postal Life Insurance Scheme) असणाऱ्या विविध विमा योजनांच्या विक्रीसाठी थेट विमा प्रतिनिधींची नेमणूक पंढरपूर येथील अधीक्षक डाकघर यांच्यामार्फत मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. थेट मुलाखतीसाठी इच्छुक उमेदवारांनी पंढरपूर येथे 17 व 18 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते दुपारी चार वाजेपर्यंत लेखी अर्ज आणि कागदपत्रांसह उपस्थित राहावे असे, आवाहन डाकघर अधीक्षक प्र. ए. भोसले यांनी केले आहे.

पंढरपूर परिसरातील तरुणांना विमा प्रतिनिधी होण्याची संधी!
'सैराट'मुळे प्रसिद्ध झालेल्या 'या' स्थळांना आजही पर्यटक देताहेत भेटी !

श्री. भोसले म्हणाले, मुलाखतीस येताना इच्छुक उमेदवारांनी सोबत अधीक्षक डाकघर, पंढरपूर यांच्या नावाने केलेला लेखी अर्ज व शैक्षणिक प्रमाणपत्रे तसेच आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्म तारखेचा दाखला ही मूळ कागदपत्रे आणि त्या कागदपत्रांची साक्षांकित प्रत, फोटो व अन्य संबंधित कागदपत्रांसह उपस्थित राहावे. उमेदवाराचे वय 18 ते 50 वर्षांपर्यंत असावे, उमेदवार दहावी पास असावा, उमेदवारास विमा विक्रीचा अनुभव, संगणकाचे ज्ञान, स्थानिक भागाची माहिती असणे अपेक्षित आहे. बेरोजगार तरुण, तरुणी, स्वयंरोजगार असणाऱ्या महिला व पुरुष, कोणत्याही कंपनीचे माजी विमा प्रतिनिधी, माजी जीवन विमा सल्लागार, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ कर्मचारी, स्वयंसेवी संघटना चालक, माजी सैनिक, निवृत्त शिक्षक, ग्रामप्रधान, ग्रामपंचायत सदस्य किंवा वरील पात्रता असणारे सर्व इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात. थेट मुलाखतीद्वारे विमा प्रतिनिधी म्हणून निवड झालेल्या उमेदवारांना टपाल विभागाने वेळोवेळी ठरवून दिल्याप्रमाणे कमिशन दिले जाईल.

पंढरपूर परिसरातील तरुणांना विमा प्रतिनिधी होण्याची संधी!
'सीआरपीएफ'मध्ये 2439 पॅरामेडिकल स्टाफची होणार भरती !

थेट मुलाखतीद्वारे टपाल जीवन विमा, ग्रामीण टपाल जीवन विमा प्रतिनिधी म्हणून निवड झालेल्या उमेदवारांना टपाल खात्यामार्फत आंतरिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाक विभागाकडून तात्पुरत्या स्वरूपात परवाना देण्यात येईल, जो आयआरडीएची परवाना परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर कायमस्वरूपी परवान्यामध्ये रूपांतरीत केला जाईल, असेही ते म्हणाले. निवड झालेल्या उमेदवारांना परीक्षा फी चारशे रुपये आणि परवाना फी पन्नास रुपये जमा करावी लागेल. निवड झालेल्या उमेदवारांना पाच हजार रुपये टपाल बचत खात्यामध्ये राष्ट्रीय बचत पत्र, किसान विकास पत्रामध्ये भारताचे राष्ट्रपती यांच्या नावे तारण म्हणून ठेवावे लागतील, असे श्री. भोसले यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.