Solapur : नवीन शाळेत रुजू न झालेल्या शिक्षकांना दणका; ऑगस्टपासूनचे वेतन थांबविण्याच्या मुख्याध्यापकांना सूचना

समायोजनानंतर संबंधित शाळेत रुजू न होता पूर्वीच्याच शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकांचे ऑगस्टपासूनचे वेतन थांबविण्याची सूचना प्राथमिक शिक्षण विभागाच्या वेतन पथकाचे अधीक्षक वि. दि. ढेपे यांनी मुख्याध्यापकांना दिले आहेत.
नवीन शाळेत रुजू न झालेल्या शिक्षकांना दणका
नवीन शाळेत रुजू न झालेल्या शिक्षकांना दणकाsakal
Updated on

सोलापूर : समायोजनानंतर संबंधित शाळेत रुजू न होता पूर्वीच्याच शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकांचे ऑगस्टपासूनचे वेतन थांबविण्याची सूचना प्राथमिक शिक्षण विभागाच्या वेतन पथकाचे अधीक्षक वि. दि. ढेपे यांनी मुख्याध्यापकांना दिले आहेत. दरम्यान, १९ जुलै रोजी प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी त्यांना तसे आदेश दिले होते.

२०२० -२१ च्या सेवक संचानुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे प्राथमिक शिक्षण विभागाने समायोजन केले आहे. मात्र, अनेक शिक्षक समायोजन केलेल्या शाळेत रुजू झाले नाहीत. त्याबाबत शाळा भरविण्याच्या वेळेविषयी आयोजिलेल्या बैठकीतही शिक्षणाधिकारी शेख यांनी इशारा दिला होता.

शहरातील एक शिक्षक अद्याप पूर्वीच्याच शाळेत कार्यरत असल्याचे सांगतानाच तातडीने समायोजन केलेल्या शाळेत हजर व्हा, अन्यथा वेतन थांबवावे लागेल असे म्हटले होते. तसेच त्यांनी अशा शिक्षकांचे वेतन थांबविण्याबाबत वेतन पथकाच्या अधीक्षकांना आदेश दिले होते.

नवीन शाळेत रुजू न झालेल्या शिक्षकांना दणका
Solapur News : स्व. भालकेनी 11 वर्षात परिचारक गटाला कधीही त्रास दिला नाही; शिवानंद पाटील

त्यांच्या आदेशानुसार वेतन पथकाचे अधीक्षक ढेपे यांनी सहा ऑगस्ट रोजी मुख्याध्यापकांना ऑगस्ट महिन्याचे वेतन देयक सादर करताना घ्यावयाच्या काळजीबाबत सूचना दिल्या आहेत. २०२० -२१ च्या सेवक संचानुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे मुख्याध्यापकांनी वेतन देयकात समाविष्ट करू नये.

समायोजन केलेल्या शाळेत रुजू न होता पूर्वीच्याच शाळेत कार्यरत शिक्षकांची नावेही त्यात समाविष्ट करू नयेत. जे शिक्षक समायोजन झालेल्या शाळेत रुजू झालेले आहेत त्याच शाळेतून त्यांचे नाव वेतन देयकात समाविष्ट करावे, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच संचमान्यतेनुसार देयके व संचमान्यता या देयकासोबत सादर करायला सांगितले आहे. या सूचनांचे पालन न केल्यास देयके अपात्र ठरविण्यात येतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.