Osmanabad : शेतकऱ्यांच्या दारात जाऊन अतिवृष्टीचे अनुदान वाटप

रांगेतून सुटकारा : भाकसखेडा-गंगापूर येथे लातूर जिल्हा बँकेचा उपक्रम
Osmanabad News
Osmanabad News esakal
Updated on

हेर : कार्यकारी सोसायटी भाकसखेडा -गंगापूर यांच्या प्रयत्नाने जिल्हा बॅंकेच्यावतीने गंगापूर येथील शेतकऱ्यांना घरोघरी जाऊन अतिवृष्टीचे अनुदान वाटप करण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांना वेळ व रांगेतून सुटकारा मिळाला आहे. गंगापूर व भाकसखेडा येथील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीचे अनुदान देवर्जन येथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत जमा झाले होते.

Osmanabad News
Osmanabad : आंदोलनाच्या निमित्ताने एकवटतोय ‘मराठा’

ते अनुदान उचलूनच शेतकऱ्यांना दिवाळी करावी लागणार असल्याने गावातून देवर्जन येथे जाऊन दिवसभर रांगेत थांबून अनुदान उचलण्यास वेळ व परेशानी होण्याची शक्यता लक्षात घेऊन गंगापूर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन विवेक पंडीत जाधव यांनी जिल्हा बॅंकेचे तालुक फिल्ड ऑफिसर हणमंत पवार यांना विनंती करून गंगापूर व भाकसखेडा येथील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान घरोघरी जाऊन वाटप करण्याची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा बॅंकेची व्हॅन गावात जाऊन शेतकऱ्यांना घरपोच अतिवृष्टीची रक्कम वाटप करण्यात आली. या मुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

Osmanabad News
Osmanabad : आमदार कैलास पाटलांच्या उपोषणाचा धसका! विमा कंपन्यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश

यासाठी बॅंकेचे फिल्ड ऑफिसर हणमंत पवार, व्हॅन प्रमुख मनोहर केंद्रे, शाखा व्यवस्थापक शंकर पात्रे, रोखपाल शिंदे व शाखा तपासणीस आण्णासाहेब मुळे यांनी तत्परता दाखवत जलद गतीने शेतकऱ्यांच्या नोंदी घेऊन ताबडतोब शेतकऱ्यांना घरपोच अनुदाची रक्कम पोचती केली.

Osmanabad News
Osmanabad : उस्मानाबाद बाजारपेठेत प्लास्टिकचा बोलबाला

चेअरमन विवेक जाधव, व्हाईस चेअरमन हंसराज माळेवाडी, संचालक गणेश पटवारी, शिवनंदाताई बिरादार, संदीप मोरे, सुधाकर बिरादार, सोजरबाई जाधव, विजयकुमार बुर्ले, अविनाश गायकवाड आदींनी परिश्रम घेतले. अनुदान आपल्या दारी हा उपक्रम राबविल्याबद्दल माजी मंत्री दिलीपराव देशमुख, जिल्हा बॅंकेचे चेअरमण आ. धीरज देशमुख, संचालिका लक्ष्मीताई भोसले, तहसीलदार रामेश्वर गोरे यांचे शेतकऱ्यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()