Solapur News : महापालिकेच्या मिळकतकर थकबाकीपोटी प्रशासनाने नेमलेल्या नऊ पथकांनी सोमवारी १५ लाख १२ हजार २२३ रुपये व मंगळवारी १३ लाख ८९ हजार ९२ रुपये, अशी तर मंगळवारी विविध कर संकलन केंद्र व ऑनलाइन याद्वारे २३ लाख ५६ हजार ८२९ रुपये वसुली केली.
दोन दिवसांत ५२ लाख ५८ हजार १४४ रुपये थकबाकी वसुली करण्यात आली आहे. तर धडक कारवाई करताना सोमवारी २४ तर मंगळवारी ३३, असे एकूण ५७ नळ दोन दिवसांत बंद करण्यात आले.
महापालिका मालमत्ता कर विभागातील कर संकलन अधिकारी युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली विविध नऊ पथकांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात येत आहे. महापालिकेच्या मालमत्ता कराची ४०० कोटींहून अधिकची थकबाकी असून मार्च अखेरपर्यंत १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट या विभागाला देण्यात आले आहे.
पथक एक - चार नळ बंद, चार लाख ८१ हजार १७० वसूल
पथक दोन - १० नळ बंद, वसुली नाही
पथक तीन - ० नळ बंद, दोन लाख ५० हजार १८० वसूल
पथक चार - चार नळ बंद, १५ हजार वसूल
पथक पाच - एक नळ बंद, एक लाख रुपये वसूल
पथक सहा - दोन नळ बंद, ७६ हजार ८५६ रुपये वसूल
पथक सात - सहा नळ बंद, तीन लाख ४२ हजार रुपये वसूल
पथक आठ - ० नळ बंद, ९३ हजार ८७८ रुपये वसूल
पथक नऊ - सहा नळ बंद, ३० हजार रुपये वसूल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.