सोलापूर : बंद भोसे योजनेच्या पाहणीसाठी पंचायत राज समिती रात्रीच्या वेळी जुनोनीत

पंचायत राज समिती जिल्हा दौय्रावर असून काल जिल्हा परिषदेत झालेल्या बैठकीत आ समाधान आवताडे यांनी या बंद योजनेबाबतची कल्पना दिली
Panchayat Raj Samiti at Junoni village night to inspect the closed Bhose water scheme solapur
Panchayat Raj Samiti at Junoni village night to inspect the closed Bhose water scheme solapur sakal
Updated on

मंगळवेढा : पंचायत राज समितीच्या पाहणी दौय्रांच्या निमित्ताने मंगळवेढा पंचायत समितीच्या आढावा बैठकीतनंतर समितीच्या सदस्यांनी थेट बंद असलेल्या 39 गावाच्या भोसे प्रादेशीक पाणी पुरवठा योजनेतील लाभधारक जुनोनी गावाला रात्रीच्या वेळी भेट देवून पाणी मिळते का त्याबाबत माहिती जाणून घेतली. या योजनेच्या पाहणीसाठी समितीचा दौरा रात्रीच्या वेळी झाल्याने रात्रीस खेळ चाले या मालिकेप्रमाणे न होत प्रत्यक्षात पाणी सुरु होण्याबाबत काय कारवाई करते याकडे लक्ष लागले.

पंचायत राज समिती जिल्हा दौय्रावर असून काल जिल्हा परिषदेत झालेल्या बैठकीत आ समाधान आवताडे यांनी या बंद योजनेबाबतची कल्पना दिली होती त्यामध्ये या योजनेबाबत लोकांच्या पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी असताना योजना वीज बिल थकीत ठेवून महाराष्ट्र जीवन प्राधीकरणने जि प कडे हस्तातरीत करण्यात आली व जिल्हा परिषदेने अर्धवट असलेली योजना का हस्तारीत करुन घेतली त्यानंतर ही जि प ने लाखो रु निधी खर्च करुनही या योजनेचे पाणी संपुर्ण गावाला मिळत नाही.त्यामुळे आ. अनिल पाटील, आ. सदाशिव खोत, आ. डॉ. देवराव होळी, आ किशोर दराडे, हे समिती सदस्य मंगळवेढा दौय्रावर येणार असल्याने पंचायत समितीने रंगरंगोटी,वेलवेटचे आच्छादन टाकत एरव्ही पंचायत समितीच्या आवारात होणारे दुचाकीचे अतिक्रमण बाजूला करत परिसर अतिक्रमण मुक्त ठेवण्यात आला 6.40 च्या दरम्यान या समितीचे आगमन पंचायत समितीच्या सभागृहात झाले यावेळी समितीचे स्वागत आ समाधान आवताडे यांनी केले यावेळी मा सभापती प्रदीप खांडेकर,सरोज काझी,येताळा भगत,सुधाकर मासाळ,दिगंबर यादव यांच्यासह पंचायत समिती स्तरावरील विविध खात्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

किरकोळ तक्रारी वगळता सर्वात महत्त्वाची तक्रार भोसे प्रादेशिक योजनेची असल्यामुळे बैठक संपल्यानंतर या समितीने जुनोनी गावास रात्री 8.50 च्या दरम्यान भेट दिली.अचानक समितीचा ताफा गावात असल्याने गावकय्रांचीही पळापळ ऐन उन्हाळयात पाण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या गावाला 39 गावाच्या भोसे प्रादेशीक पाणीपुरवठा योजनेचे पाणी मिळते का यापुर्वी कधी मिळाले याबाबत विचारणा केली असताना पाणी मिळाले नाही सध्या पाणी पटटी भरुन घेतली पण पाणी दिले जात नसल्याचे सांगण्यात आले रात्रीच्या वेळी पाहणी करण्यासाठी आलेली समिती फक्त गावकय्राशी संवाद साधून गेली वास्तवित पाहता 71 कोटीपेक्षा अधिक रकमेचा निधी खर्चुन बेवारस असलेली मालमत्तेची तरी किमान पाहणी करणे अपेक्षित होते अशी या भागातील नागरिकातून बोलले जात आहे त्यामुळे आता बंद भोसे योजनेवर समिती काय निर्णय घेते याकडे या परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.