Solapur News : पंचायत समिती प्रशासकीय विभागाय 213 जागा रिक्त : मंगळवेढा तालुक्यातील स्थिती

पंचायत समिती ही ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेच्या मध्ये दुवा म्हणून काम करते.तालुक्यातील प्रशासन विभागात येणाऱ्या शिक्षण विभाग,आरोग्य विभाग,पशुवैद्यकीय विभाग,बांधकाम विभाग व गावचा गाडा हाकणारी ग्रामपंचाय विभागाचे प्रमुख कारभार तालुका पंचायत समित्यांमधून चालते.
Solapur News
Solapur Newssakal
Updated on

सलगर बुद्रुक( जिल्हा सोलापूर) : पंचायत समिती ही ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेच्या मध्ये दुवा म्हणून काम करते.तालुक्यातील प्रशासन विभागात येणाऱ्या शिक्षण विभाग,आरोग्य विभाग,पशुवैद्यकीय विभाग,बांधकाम विभाग व गावचा गाडा हाकणारी ग्रामपंचाय विभागाचे प्रमुख कारभार तालुका पंचायत समित्यांमधून चालते.पण मंगळवेढा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शिक्षण, आरोग्य,पशुवैद्यकीय,बांधकाम आणि ग्रामपंचायत प्रशासनातील रिक्त पदांमुळे तालुक्यातील प्रशासकीय विभाग दुबळा झाल्याचे वास्तव आहे.विविध विभागावातील 213 कर्मचाऱ्यांची भरती अपूर्ण आहे.

दरम्यान चालू वर्ष निवडणुकांचे वर्ष असणार आहे.लोकसभा त्यापाठोपाठ विधानसभा,नगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हे वर्ष जाणार आहे.त्यामुळे अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कार्यरत त्या त्या विभागातील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण जाणवणार आहे. शिक्षण,आरोग्य व ग्रामपंचायत विभागात अपुरे कर्मचारी-तालुक्यातील शिक्षण विभागातील 139 जागा अपुऱ्या आहेत.त्यापाठोपाठ आरोग्य विभागातील 39 आणि ग्रामपंचायती मधील 8 जागा रिक्त आहेत.शिवाय तालुका पंचायत समिती मधील

Solapur News
Solapur : मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा प्रश्न अधिवेशनापूर्वी मार्गी लावू ; अजित पवार

महत्वाच्या 23 जागा रिक्त आहेत.त्यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून सेवा देताना हेळसांड होताना दिसत आहे. रिक्त जागांची वाळवी - शहर व 81 गावच्या प्रशासन व्यवस्थेचा बोजा वाहणाऱ्या तालुक्यातील प्रत्येक प्रशासकीय विभागाला रिक्त पदांची वाळवी लागली आहे.त्यातच अतिरिक्त कामाचा ताण,वैयक्तिक कामे,आरोग्य विषयक तक्रारी यांचे कारण पुढे करून कार्यरत कर्मचाऱ्यांच्या रजेमुळेही प्रशासकीय विभागातील कार्यालये व कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या शोभेच्या बाहुल्या बनून उभ्या असतात.याचा नाहक त्रास नागरिकांना सेवा प्रदान करताना होत आहे.त्यामुळे तालुक्यातील सर्वच प्रशासकीय विभागातील रिक्त पदे भरली जावीत अशी मागणी नागरीक करत आहेत.

रिक्त जागा - पंचायत समिती विभाग

१) कनिष्ठ सहायक - 6

२)परिचर - 15

३)विस्तार अधिकारी (पं) 1

४)विस्तार अधिकारी (सां) 1

5)ग्रामविकास अधिकारी - 3

६)ग्रामसेवक - 5

आरोग्य विभाग -

२)औषध निर्माण अधिकारी 3

२) आरोग्य सहायक -4

३) आरोग्य सहाय्यीका -3

४) आरोग्य सेवक - 4

५) आरोग्य सेविका -25

पशुवैद्यकि विभाग

१) पशूधन पर्यवेक्षक - 4

शिक्षण विभाग

१)केंद्रप्रमुख - 10

२) पदवीधर शिक्षक - 20

३)मुख्याद्यापक -7

4) उपशिक्षक - 92

बांधकाम विभाग -

१)शाखा आभियंता -7

अंगणवाडी विभाग

१) अंगणवाडी सेविका - 3

शिवाजी पाटील,गटविकास अधीकारी मंगळवेढा- मंगळवेढा पंचायत समिती अखत्यारीतील शिक्षण विभाग,आरोग्य विभाग,पशुवैद्यकीय विभाग,ग्रामपंचायत विभाग व बांधकाम विभागावातील 213 पदे रिक्त आहेत.शिक्षण व आरोग्य विभागातील जादा पदे रिक्त आहेत.याबाबत वरिष्ठ विभागाला वेळो वेळी माहिती कळीवली आहे.शासकीय नियमानुसार जागा भरल्या जातील.

- महेश पाटील सकाळ वृत्तसेवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.