मंगळवेढा - पंढरपूर विधानसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या जागेची मागणी काँग्रेस पक्षाकडून होत असल्याने महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर उमेदवार जाहीर करणार असल्याचे खा. सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
पंढरपूरच्या जागेसाठी इच्छुक अनेक आहेत. त्यामुळे अर्ज दाखल करण्याचा कालावधी जवळ येत असल्याने उमेदवार लवकर निश्चित करावा, या मागणीसाठी मंगळवेढ्यातील राष्ट्रवादीचे मुजमिल काझी, आण्णा शिरसाट, पांडुरंग चौगुले या शिष्टमंडळाने खा. सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन त्याबाबतची मागणी केली.