मंगळवेढा - पंढरपूर विधानसभेच्या आखाड्यात उमेदवारी अर्ज भरण्याचा मुहूर्त साधून इच्छुकांनी अपक्ष अर्ज भरण्यास सुरुवात केली असली तरी महाविकास आघाडी व महायुतीने अद्याप त्यांच्या उमेदवाराची अधिकृत घोषणा केली नाही. प्रशांत परिचारक हे कुणाच्या गळाला लागतात, यावर या उमेदवाराची घोषणा होऊ शकते, अशी चर्चा मंगळवेढ्यातील राजकीय वर्तुळात सुरू झाली.