Bazar Samiti Result : पंढरपूर बाजार समितीवर भाजपच्या माजी आमदाराचं वर्चस्व; 18 उमेदवार विजयी

गेल्या काही दिवसांपासून पंढरपूरचं राजकारण चर्चेत होतं, त्यामुळं इथं कोण बाजी मारणार याची उत्सुकता होती.
Pandharpur Bazar Samiti Election Results
Pandharpur Bazar Samiti Election Resultsesakal
Updated on
Summary

बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक गटानं एक हाती सत्ता मिळवली.

Pandharpur Bazar Samiti Election Results : गेल्या काही दिवसांपासून पंढरपूरचं राजकारण चर्चेत होतं, त्यामुळं इथं कोण बाजी मारणार याची उत्सुकता होती.

दरम्यान, पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत (Pandharpur Market Committee Election) भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) गटाचे 18 उमेदवार विजयी झाले आहेत, त्यामुळं पंढरपूरचं परिचारकांचं वर्चस्व पुन्हा एकदा सिध्द झालं आहे.

Pandharpur Bazar Samiti Election Results
Bazar Samiti Result : 'या' तीन आमदारांनी करुन दाखवलं! जावळी-महाबळेश्वरात 'मविआ'चा केला सुपडासाफ

पंढरपूरसह अकलूज, कुर्डुवाडी या तीन बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज (शनिवार) सकाळपासून मतमोजणी सुरू झाली. पंढरपुरातील बाजार समितीच्या 18 पैकी 5 जागा यापूर्वीच परिचारक गटानं बिनविरोध मिळविल्या होत्या.

Pandharpur Bazar Samiti Election Results
Karnataka Election : 'या' बड्या अभिनेत्याच्या पत्नीचा काँग्रेसमध्ये प्रवेश; 'हा' अभिनेता करणार भाजपचा प्रचार

दरम्यान, 13 जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी पार पडली. पंढरपूरमधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक गटानं एक हाती सत्ता मिळवली. परिचारक गटानं 18 पैकी 18 जागा जिंकल्या आहेत.

Pandharpur Bazar Samiti Election Results
Dhananjay Mahadik : 'राजाराम'चा गुलाल उधळल्यानंतर महाडिकांची कर्नाटकात एन्ट्री; 'या' उमेदवाराचा केला प्रचार

येथील बाजार समितीवर परिचारक गटाची गटाची गेल्या 25 वर्षांपासून सत्ता आहे. आजच्या विजयानं परिचारक गटावर पुन्हा शेतकऱ्यांनी विश्वास दाखविल्याचं दिसून येतं. या निवडणुकीत विरोधी पाटील गटाचा दारूण पराभव‌ झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.