घरफोडी! दोन सराईत गुन्हेगारांना अटक; 2.84 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

घरफोडी! दोन सराईत गुन्हेगारांना अटक; 2.84 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
 अटक
अटकEsakal
Updated on
Summary

पंढरपूर शहर व परिसरात चोरीचे गुन्हे करणाऱ्या दोन सराईत आरोपींना कराड येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर (Pandharpur, Solapur) शहर व परिसरात चोरीचे गुन्हे (Crime) करणाऱ्या दोन सराईत आरोपींना कराड (Karad) येथून ताब्यात घेण्यात आले आहे. दीपक महादेव थोरात (रा. करवडी, ता. कराड, जि. सातारा) व दादासाहेब ऊर्फ दत्ता नाथा कांबळे (रा. येवती, ता. कराड, जि. सातारा) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मागील महिन्यात पुंडलिक नगर भागातील गोविंद रघुनाथ सबनीस यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञातांनी सोन्याचे दागिने व चांदीच्या वस्तूंसह एक लाख 18 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात (Pandharpur City Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या (Crime Branch) पथकाने चोरी प्रकरणाचा तपास लावला आहे.

 अटक
पंढरपूरसह पाच तालुक्‍यांत आजपासून कडक निर्बंध !

सदर गुन्ह्यातील आरोपी हे कराड शहरातील एसटी स्टॅंड समोर थांबले असल्याची माहिती मिळाल्याने त्या ठिकाणी जाऊन बातमीप्रमाणे पाहणी केली असता, दोन इसम संशयितरीत्या थांबले असल्याची खात्री झाल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली. या वेळी त्यांनी सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी मागील एक ते दीड महिन्यापूर्वी सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली. तसेच त्यांनी मागील काही महिन्यांपूर्वी पंढरपूर शहरात घरफोडी केल्याचे सांगून सदर गुन्ह्यातील चांदीचे ताट व समई चोरी केल्याचे सांगितले. त्यांच्या कब्जातून गुन्ह्यातील चोरीस गेलेले सोन्याचे नेकलेस, सोन्याचे टॉप्स, सोन्याचे दागिने व चांदीचे शिक्के, समई, चांदीचं ताट असा एकूण दोन लाख 24 हजार 863 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 अटक
नागपंचमी विशेष : पाच लाख उंदरांवर नियंत्रण ठेवणारा निसर्गरक्षक !

पकडलेल्या इसमांपैकी एक सांगली व सातारा जिल्ह्यातील रेकॉर्डवरचा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध इस्लामपूर, सांगली व कराड येथे गुन्हे दाखल आहेत. या संशयित आरोपींना पंढरपूर शहर पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले असून त्यांच्याकडून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता आहे. ही कामगिरी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते व अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र मांजरे, सहाय्यक फौजदार खाजा मुजावर, पोलिस हवालदार नारायण गोलेकर, धनाजी मांजरे, मोहन मनसावाले, पोलिस अंमलदार धनराज गायकवाड, अक्षय दळवी, चालक समीर शेख यांनी बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.