Pandharpur: विठ्ठलाला अर्पण केलेले पोतंभर दागिने निघाले खोटे! काय घडलाय प्रकार वाचा

राज्यातील देवस्थानांमध्ये दान म्हणून पैसे, सोनं-चांदी असा ऐवज देण्याची पद्धत अलिकडे खूपच वाढली आहे.
Pandharpur Vitthal Temple Donation News
Pandharpur Vitthal Temple Donation News
Updated on

पंढरपूर : राज्यातील अनेक प्रसिद्ध देवस्थानांमध्ये दान म्हणून पैसे, सोनं-चांदी असा ऐवज देण्याची पद्धत अलिकडे खूपच वाढली आहे. भरपूर पैसा असणारे लोक बऱ्याचदा देवाच्या दान पेट्यांमध्ये या वस्तू दान करत असतात. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दानपेटीतही अशा प्रकारे दान येत असतं पण यंदा यातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे ती म्हणजे विठ्ठलाला अर्पण केलेल्या एकूण दागिन्यांपैकी पोतंभर दागिने हे बनावट असल्याचं समोर आलं आहे. (Pandharpur Donation jewels donated to Vitthal turned out to be fake)

Pandharpur Vitthal Temple Donation News
Urfi Javed Case: सुषमा अंधारेंना चित्रा वाघ यांचं प्रत्युत्तर; म्हणाल्या, चार भिंतीच्या आत...

विठ्ठल मंदिरात अशा प्रकारे दान जमा झाल्यानंतर त्याची मंदिर प्रशासनाकडून मोजदाद केली जाते. कुठल्या प्रकारचं दान आहे त्यानुसार या दानाचं वर्गिकरण केलं जातं तसेच त्याचं मुल्यही तपासलं जातं.

पण हे मुल्य तपासताना संबंधित पैसे किंवा सोन-चांदी खरे आहेत का? हे देखील तपासावं लागतं. कारण बऱ्याचदा दानपेटीत बनावट पैसे आणि दागिनेही येतात. अशाच तपासणीदरम्यान, बनावट दागन्यांची वेगळी साठवणूक करण्यात आली ती तब्बल एक पोतभरं इतकी निघाली. त्यामुळं विठ्ठलाला दान दिलेल्या दागिन्यांपैकी पोतंभर दागिने बनावट असल्याचं सिद्ध झालं आहे.

Pandharpur Vitthal Temple Donation News
Chitra Wagh on Urfi Jawed: आधी कपडे तर घाला मग बघू कोणी काय...; चित्रा वाघांचा उर्फीवर निशाणा

विठ्ठलाच्या दानपेटीत इतके दागिने झाले जमा

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आलेल्या दानपेटीत 31 किलो सोनं आणि 1050 किलो चांदी जमा झाली आहे. यापूर्वी मंदिर प्रशासनानं घेतलेल्या निर्णयानुसार, या सोन्याच्या दागिन्यांपासून सोन्याच्या वीटा तयार करण्यात येणार आहेत.

सोन्याच्या वीटा तयार करताना दागिन्यांची २४ कॅरेटची शुद्धता राखली जाते, त्यामुळं दागिने घडवताना लागणारे इतर धातू त्यातून वेगळे केले जातात. त्यामुळं या सोन्याच्या वीटांचं मुल्य शुद्ध स्वरुपात राखलं जातं.

Pandharpur Vitthal Temple Donation News
Maharashtra Mahayuti: चक्क भाजप-राष्ट्रवादी-काँग्रेस अन् शिंदे गटाची महायुती; ठाकरे गट एकाकी

भाविकांची फसवणूक टाळण्यासाठी मंदिर प्रशासनाचं आवाहन

देवाला दान दिल्यानं तो पावतो असा भाविकांचा समज आहे खरा! पण तो किती खरा किती खोटा ही बाब अलाहिदा. कारण विठ्ठलाच्या मंदिरात खोटे दागिने आढळून आले यावरुन तीन शक्यता नाकारता येत नाहीत.

त्या म्हणजे काही भाविक खरेच दागिने अर्पण करतात, दुसरं म्हणजे मुद्दामहून काही भाविक खोटे दागिन अर्पण करतात आणि तिसरं कारण म्हणजे देवासाठीचे दागिने विकताना सराफी व्यावसायिकांकडून भाविकांची फसवणूक करत त्यांना बनावट दागिने विकले जातात.

त्यामुळं भाविकांनी देवाला अर्पण करण्याच्या दागिन्यांची देखील सराफा दुकानातून पावती जरुर घ्यावी त्यामुळं फसवणूक टाळता येईल, असं आवाहन मंदिर व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी व्यक्त केल्याचं एबीपी माझानं आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

हेही वाचा: ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

विठ्ठलाला प्रामुख्यानं कुठल्या प्रकारचे दागिने अर्पण केले जातात?

राज्यातील गोरगरीबांचा आणि शेतकऱ्यांचा देव म्हणून विठुराया ओळखला जातो. त्यामुळं आपल्या आर्थिक कुवतीनुसार त्याला पाळणे, कानातले, नाकातले तसेच छोटे-मोठे सोन्या-चांदीचे दागिने भाविकांकडून अर्पण केले जातात. पण हे दागिने विकत घेतानाही भाविकांची फसवणूक होऊ शकते हे यावरुन दिसून येतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()