पंढरपूर : कार्तिकी एकादशी मंगळवारी (ता. १२) आहे. या यात्रेला अंदाजे ८ ते १० लाख वारकरी भाविक येथील, असा अंदाज आहे. यात्रा कालावधीत भाविकांना जास्तीत जास्त चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत..दर्शनरांगेत बॅरिकेडिंग करून त्यावर ताडपत्री शेड, जादा पत्राशेडची निर्मिती, आपत्कालीन गेट, विश्रांती कक्ष, फॅब्रिकेटेड शौचालये, बसण्याची सुविधा, लाइव्ह दर्शन, कुलर-फॅन, मिनरल वॉटर व चहा वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.शेळके म्हणाले, भाविकांचे लवकरात लवकर दर्शन होण्यासाठी दर्शनरांग जलद व द्रुतगतीने पुढे सरकावी, यासाठी आवश्यक त्या उपाय योजना करण्यात येत आहेत. भाविकांच्या हस्ते केल्या जाणाऱ्या पूजा बंद करण्यात आल्या आहेत. ऑनलाइन दर्शन बुकिंग पास बंद ठेवण्यात आल्या आहेत. दर्शन रांगेत घुसखोरी केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. अनुभवी व प्रशिक्षित कमांडोंची नियुक्ती करण्यात आली आहे..Solapur Development : दीडशे कोटींच्या विकासकामांना सत्ता स्थापनेनंतरचा मुहूर्त.परंपरेनुसार श्रींचा पलंग काढल्याने दैनंदिन २४ तास मुखदर्शन व २२ तास पदस्पर्श दर्शन उपलब्ध होत आहे. यात्रा कालावधीतील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराशी संबंधित असलेल्या प्रथा व परंपरांचे कटाक्षाने पालन करण्यात येत असून श्रींचा पलंग काढणे, एकादशीच्या सर्व पूजा, महानैवेद्य, श्रींच्या पादुकांची मिरवणूक, महाद्वार काला व प्रक्षाळपूजेचे योग्य ते नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय, आपत्कालीन व सुरक्षा व्यवस्थेकामी, सोलापूर महापालिकेकडील रेस्क्यू व्हॅन प्रशिक्षित कर्मचाऱ्यांसह, सिझफायर यंत्रणा, स्कायवॉकवर आपत्कालीन गेट व फोनची व्यवस्था, चंद्रभागा नदीपात्रात आपत्ती व्यवस्थापन पथकाची नियुक्ती, अत्याधुनिक ११८ सीसीटीव्ही कॅमेरे व त्यासाठी कंट्रोल रूम, वायरलेस यंत्रणा, जनरेटर, मेटल डिटेक्टर, सार्वजनिक प्रसारण सूचना प्रणाली, चौकशी कक्ष, बँग स्कॅनर मशिन, अपघात विमा पॉलिसी, मॅन काउंटिंग मशिन इ. व्यवस्था करण्यात आली आहे.देणगी घेण्यासाठी जादा २० स्टॉलची निर्मिती व ऑनलाइन देणगीसाठी QR CODE, RTGS ची सुविधा, सोने-चांदी वस्तू दान करण्यासाठी स्वतंत्र कक्ष तसेच नगरप्रदक्षिणा, दर्शनरांग, मंदिर प्रदक्षिणा, चंद्रभागा वाळवंट इ. पंढरपूर नगरपरिषद हद्दीतील ठिकाणची स्वच्छता देखील मंदिर समिती मार्फत करण्यात येत आहेत..वैद्यकीय व्यवस्थेच्या दृष्टीने मंदिर परिसरामध्ये दोन अद्ययावत रुग्णवाहिका वैद्यकीय पथकासह सज्ज ठेवण्यात आले आहेत. मंदिर समितीमार्फत श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडपात प्रथमोपचार केंद्र, वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्ट, मुंबई यांच्यामार्फत मंदिराच्या माळवदावर भाविकांसाठी मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून येणार आहे. तसेच दर्शनरांगेत शासनाच्या आरोग्य विभागामार्फत दर्शनमंडप व पत्राशेड येथे आयसीयू, बाजीराव पडसाळी, सारडा भवन इत्यादी ठिकाणी आरोग्य व्यवस्था असणार आहे. महिला भाविकांच्या सोईसाठी सॅनिटरी नॅपकीन, हिरकणी कक्ष व चंद्रभागा वाळवंटात चेंजिंग रूम उभारण्यात येत आहेत. चेंजिंग रूमचे ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने महिला कमांडोची नियुक्ती करण्यात येत आहे.पत्राशेडमध्ये २४ तास मोफत भोजनश्रींचा प्रसाद म्हणून बुंदी व राजगिरा लाडूप्रसाद व त्यासाठी पश्चिमद्वार, उत्तरद्वार व्यतिरिक्त श्री संत तुकाराम भवनात नवीन स्टॉलची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच दर्शनरांगेत साबुदाणा/तांदळाची खिचडी व चहा तसेच मागील वर्षाप्रमाणे चार दिवस पत्राशेडमध्य २४ तास मोफत भोजन व्यवस्था करण्यात येत आहे. या सर्व नियोजनासाठी सुमारे १८०० अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवक सेवा पार पाडणार असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले..ठळक बाबी...भाविकांना पुरेशा प्रमाणात सोई सुविधा देण्यावर भरसुमारे १८०० अधिकारी, स्वयंसेवक - कर्मचाऱ्यांची नियुक्तीदर्शनरांग द्रुतगतीने चालवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनादेणगी घेण्यासाठी जादा २० स्टॉलची निर्मितीदर्शन रांगेत घुसखोरी केल्यास संबंधितांवर गुन्हा.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.