मंगळवेढा : पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Pandharpur Mangalwedha Assembly by-election) निकालामध्ये शहरातून समाधान आवताडे (Samadhan Awtade) यांना मिळालेले चार हजार 337 मताधिक्य हे विजयाला कारणीभूत ठरले. याशिवाय तालुक्यातील 34 गावांत देखील त्यांना मताधिक्य मिळाले आहे. (The majority of votes in the city on Mangalwedha caused Avtade to become an MLA)
17 एप्रिल रोजी झालेल्या पोटनिवडणुकीच्या मतदानाची मतमोजणी रविवारी (ता. 2) पार पडली. त्यामध्ये दामाजी कारखान्यासह तालुक्यामधील विविध सहकारी संस्था, जिल्हा परिषद व पंचायत समितीसह ग्रामपंचायतीवर वर्चस्व असलेल्या आवताडे गटाला जवळपास 34 गावांत मताधिक्य मिळाले. त्यामध्ये पंचायत समितीच्या सभापती प्रेरणा मासाळ, उपसभापती सुरेश ढोणे यांच्या गावात आवताडे यांना मताधिक्य मिळाले नाही, तर माजी सभापती प्रदीप खांडेकर (हिवरगाव), शीला शिवशरण (भालेवाडी), मंजुळा कोळेकर (पाटकळ), विमल पाटील (लक्ष्मी दहिवडी) उज्ज्वला मस्के (डोंगरगाव) यांच्या गावात मताधिक्य मिळाले. उपाध्यक्ष दिलीप चव्हाण हे आजारी असल्यामुळे निवडणुकी दरम्यान प्रचारात सक्रिय नव्हते. त्यांच्या गावातही कमी मते मिळाली. तळसंगी, जंगलगी, आसबेवाडी या गावातील परिचारक (MLA Prashant Paricharak) समर्थकांचे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरले तर काही गावांत परिचारक समर्थकांच्या गावात देखील अपेक्षित मताधिक्य घेता आले नाही.
याशिवाय दामाजी कारखान्याच्या संचालक असलेल्या डोणज, तळसंगी, पाटकळ, मारापूर, कागष्ट या गावात मताधिक्य मिळाले. मात्र रड्डे, भोसे, हुन्नूर, नंदेश्वर, अरळी, ब्रह्मपुरी, माचणूर, आंधळगाव या गावात मताधिक्य मिळाले नाही. तालुक्यातून समाधान आवताडे यांना 57 हजार 163 मते मिळाली तर भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांना 54 हजार 219 इतकी मते मिळाली. त्यामध्ये 2944 मतांचे आधिक्य समाधान आवताडे यांना मिळाले. शहर व लगतच्या दोन ग्रामपंचायतींचा विचार करता त्यांना 10 हजार 558 मते मिळाली तर भगीरथ भालके यांना 6 हजार 221 मते मिळाली. यामध्ये 4337 मताचे मताधिक्य आवताडे यांना मिळाले; मात्र ग्रामीण भागात समाधान आवताडे यांना 46 हजार 585 टक्के मते मिळाली तर भगीरथ भालके यांना 47 हजार 998 इतकी मते मिळाली. ग्रामीण भागातून भगीरथ भालके यांना 1413 इतके मताधिक्य मिळाले. दिवंगत भारत भालके यांचा संबंध ग्रामीण भागाशी अधिक असल्यामुळे ग्रामीण भागातील मतदार त्यांच्या पाठीशी राहिले. परंतु 2019 मध्ये शहरामध्ये कमी मते पडली. यंदाही जवळपास तितकाच महत्त्वाचा फरक दोघांमध्ये राहिला.
समाधान आवताडे यांना मताधिक्य दिलेली गावे...
मंगळवेढा शहर, मानेवाडी, लवंगी, जंगलगी, सलगर खुर्द, आसबेवाडी, शिवणगी, येळगी, बावची, जित्ती, येड्राव, माळेवाडी, कर्जाळ, कात्राळ, कागष्ट, बालाजीनगर, तळसंगी, गणेशवाडी, पाटकळ, डोंगरगाव, हिवरगाव, भालेवाडी, डोणज, बोराळे, तामदर्डी, कचरेवाडी, लक्ष्मी दहिवडी, शेलेवाडी, अकोला, मल्लेवाडी, देगाव, घरनिकी, मारापूर, गुंजेगाव, महमदाबाद (शे.).
भगीरथ भालके यांना मते मिळालेली गावे...
पडोळकरवाडी, लोणार, ममदाबाद हु., रेवेवाडी, हुन्नूर, शिरनांदगी, मारोळी, सलगर बु, पौट, चिक्कलगी, रड्डे ,भोसे, खडकी, जालिहाळ, सिद्धनकेरी, निंबोणी, खवे, हुलजंती, डिकसळ, भाळवणी, हजापूर, मेटकरवाडी, जुनोनी, खुपसंगी, गोणेवाडी, शिरसी, लेंडवेचिंचाळे, खोमनाळ, फटेवाडी, नंदूर, अरळी, सिद्धापूर, तांडोर, माचणूर, मुंडेवाडी, आंधळगाव, ब्रह्मपुरी, बठाण, उचेठाण, मुढवी.
आमदार आवताडे यांच्यासमोरील आव्हाने
तीन वर्षांच्या कालावधीमध्ये आवताडे यांना उल्लेखनीय काम करून दाखवावे लागणार आहे. त्यामध्ये सर्वांत अगोदर कोरोना संकटाशी सामना करताना शहरामध्ये कोव्हिड सेंटर सुरू करून तालुक्यातील आरोग्यसेवा सक्षम करण्याची आवश्यकता आहे. तालुक्यातील आरोग्य केंद्रात रिक्त असलेली पदे व आरोग्य सुविधा सक्षम करण्याची आवश्यकता आहे. आरोग्य खात्यात रजा काढून जाणाऱ्यांचे प्रमाण देखील वाढले आहे. या सर्व गोष्टींबरोबर तालुक्यातील प्रलंबित असलेल्या आरोग्य उपकेंद्रांसह प्रस्तावित ग्रामीण रुग्णालयांचा प्रश्न मार्गी लागणे आवश्यक आहे. शहरातील क्षेत्र विकास आराखडा, मंजूर बसवेश्वर स्मारकासाठी निधी, चोखोबा स्मारक, मंगळवेढा उपसा सिंचन योजना, कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांना लाभ मिळवून देणे, 2020 च्या खरीप हंगामातील बहुसंख्य शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत त्यांना विम्याचा लाभ मिळवून देताना तालुक्याच्या ग्रामीण भागात रस्ते, शिक्षण या सुविधा देखील मिळवण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहे. सध्या ते विरोधी पक्षाचे आमदार असल्यामुळे तीन वर्षांत त्यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. तरी ती कसोटी कसे पार पाडतात, हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.